मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोल वसुलीची अधिसूचना जारी; तीस वर्षे टोल भरावा लागणार
- कोयना धरणग्रस्त करणार क्रांतिदिनी जलाशयात आंदोलन
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
किराणा व्यापारातील थेट विदेशी गुंतवणुकीच्या मुद्यावर यूपीएतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या द्रमुकने पाठिंबा जाहीर केल्याने केंद्र सरकारला मंगळवारी मोठे पाठबळ मिळाले. त्यामुळे आतापर्यंत या मुद्यावर संसदेत चर्चेनंतर मतविभाजनाची मागणी फेटाळणाऱ्या सरकारने लोकसभेत थेट विरोधकांशी चार हात करण्याची तयारी दर्शवली. सरकारच्या या पवित्र्यामुळे एफडीआयचा विरोध रेटून धरण्यासाठी आता विरोधकांना जुळवाजुळव करावी लागणार आहे.
मनमोहन सिंग सरकारला बाहेरून समर्थन देणारे समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष मतदानाच्या वेळी सभात्याग करू शकतात. पण थेट विदेशी गुंतवणुकीला विरोध करणाऱ्या द्रमुकने सरकारची साथ देण्याचा निर्णय घेतल्याने विरोधकांचा सामना करण्यासाठी सरकारपाशी पुरेसे संख्याबळ आहे. भाजप-रालोआ, डावी आघाडी, अण्णा द्रमुक आणि तृणमूल काँग्रेस या मुद्यावरून सरकारला गोत्यात आणू शकतात काय, याकडे लक्ष लागलेले असेल.
यूपीए सरकारला मतदानाची चिंता नसून कोणत्या नियमाखाली चर्चा करावी, हे लोकसभा अध्यक्षांनी ठरवावे, असे संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी मंगळवारी काँग्रेस-यूपीएच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. मतविभाजनाची तरतूद असलेल्या नियम १८४ अंतर्गत लोकसभेत चर्चा करण्याच्या विरोधकांच्या मागणीवरून गेल्या चार दिवसांपासून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज खोळंबले आहे. गुरुवारी संसदेचे कामकाज पुन्हा सुरू होईल, तेव्हा नियम १८४ अंतर्गत चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, अविश्वास प्रस्तावाला साथ दिली नाही म्हणून तृणमूल काँग्रेस भाजपवर नाराज आहे. त्यामुळे मतविभाजनाच्या प्रस्तावावर भाजपला साथ द्यायची नाही, अशीही भूमिका तृणमूल काँग्रेसकडून घेतली जाऊ शकते. सरकारच्या कार्यकारी निर्णयावर संसदेत मतविभाजन करणे संसदीय परंपरेला धरून नसल्याचा युक्तिवाद करणाऱ्या यूपीएला लोकसभेत संख्याबळ आपल्या बाजूने असल्याचे निर्णायकपणे सिद्ध करावे लागणार आहे.




















काँग्रेसने या देशातल्या लोकशाहीचा व राजकारणाचा उघड उघड बाजार मांडलाय .कालपर्यंत एफडिआयला कडाडुन विरोध करणार्या युपिएच्या द्रमुक नावाच्या घटक पक्षाला भाजपाच्या तथाकथित सांप्रदायिक असण्याचा अचानक आठव आला व त्याने एफडिआयला विरोध कायम असून सांप्रदायिकतेच्या विरोधात आपण युपिएला मतदान करणार असे जाहिर केले..जनतेला मुर्ख समजतात की काय हे कॉग्रेस व त्यांची हि तथाकथित निधर्मीवादी पिल्लावळ ?.कनिमोजीला २जीच्या घोटाळ्यातून सोडवण्याच्या बोलीवर द्रमुकने युपिएच्या बाजूने मतदान करण्याची ग्वाही दिलीय याला म्हणतात मांडवली करणे… काँग्रेसने खरच लोकशाहीच्या नावाखाली ब्लॅकमेलीगचा उघड उघड धंदा उघडलाय..