मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या व्हच्र्युअल क्लासरूम योजनेच्या माध्यमातून मतदार जागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची मुहूर्तमेढ करणारा कार्यक्रम अलीकडेच झाला. व्हच्र्युअल क्लासरूमच्या माध्यमातून मतदानाबाबत मिळणारा संदेश विद्यार्थी आपले पालक आणि आसपासच्या मतदारांपर्यंत पोहोचवतील. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.