परळ येथील डॉ. ई. बोर्जीस रोडवर मोनो रेलच्या कामाच्या फटक्यामुळे गुरुवारी रात्री जलवाहिनी फुटल्याने शुक्रवारी टाटा आणि केईएम रुग्णालयाच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला. टाटा रुग्णालयाला शुक्रवारी टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. मोनो रेलच्या कामासाठी डॉ. ई. बोर्जीस रोडवर २०४ टन वजनाची क्रेन ठेवण्यात आली होती. वाडिया आणि टाटा रुग्णालयामधून जाणारी जलवाहिनी क्रेनच्या वजनाच्या भारामुळे फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. या जलवाहिनीमधून केईएम आणि टाटा रुग्णालयाला पाणीपुरवठा करण्यात येत असून ती फुटल्यामुळे या रुग्णालयांच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला.

Water supply stopped in Goregaon Malad Kandivali on Tuesday
मुंबई : गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद
An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
Sakkardara flyover, Nagpur,
नागपूर : भरधाव वाहनांसह अपघाताच्या भीतीचे सावट, सक्करदरा उड्डाण पुलावर मागील वर्षात १३ अपघात
पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’, पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी