गोरेगावमधील जनरल अरुण कुमार वैद्य मार्गावरील एका १२ मजली इमारतीच्या गच्चीतील पाण्याची टाकी फुटली. या टाकीचे तुकडे रस्त्यावर पडले आणि त्यामुळे दोन गाडय़ांचे नुकसान झाले. या घटनेत सुदैंवाने कुणीही जखमी झाले नाही, असे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले.
जनरल अरुम कुमार वैद्य मार्गावरील दिंडोशी अग्निशमन केंद्रासमोर १२ मजली ओमकार बिल्डिंग आहे. या इमारतीच्या गच्चीवरील सिंटेक्सची पाण्याची टाकी अचानक फुटली आणि पाणी वाहून गेले. तसेच गच्चीवरुन रस्त्यावर पडलेल्या टाकीच्या तुकडय़ांमुळे दोन गाडय़ांचे नुकसान झाले. या प्रकारामुळे या परिसरात घबराट पसरली होती.