मुंबईतील रस्ते आणि रेल्वे या दोन प्रमुख वाहतूक साधनांवर पडणारा प्रचंड ताण लक्षात घेता मुंबईकरांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था तयार करण्याचा विचार आता प्रत्यक्षात येणार आहे. गेली अनेक वर्षे फक्त चर्चेच्याmu06 कचाटय़ात अडकलेला जलवाहतुकीचा पर्याय आता येत्या १८ महिन्यांत प्रत्यक्षात येऊ शकेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ही जलवाहतूक पहिल्या टप्प्यात मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर, म्हणजेच नवी मुंबई, शिवडी, ठाणे, आदी भागांत सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.
 हा प्रकल्प महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या सहभागातून पूर्ण होणार असून त्यासाठी १२० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. पूर्व उपनगरांतील या वाहतूक प्रयोगानंतर पश्चिम उपनगरांना जोडणारी जलवाहतूक व्यवस्थाही सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे.

मुंबई ते नवी मुंबई, शिवडी आणि ठाणे</strong>
खर्च : १२० कोटी रु. (७० कोटी महाराष्ट्र
मेरिटाइम बोर्ड आणि ५० कोटी मुंबई पोर्ट
ट्रस्ट यांच्याक़डून)
पूर्तता कालावधी : १८ महिने