दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आरपीआय नेते रामदास आठवले यांनी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेत भाजपसोबत युती करण्यास कुठलीही अडचण नसल्याचे उध्दव ठाकरे यांनी सांगितल्याची माहिती आठवलेंनी पत्रकरांशी बोलताना दिली. युतीबाबत सविस्तर चर्चा दिवाळीनंतर करण्यात येणार असून ताबडतोब नवीन सरकार स्थापन करण्यात येईल, असंही आठवले यावेळी म्हणाले.
आठवले-उध्दव यांच्या भेटीत राज्यात सत्तास्थापनेबद्दल चर्चा झाली. त्यावेळी शिवसेनेला सोबत घेण्यावाचून भाजपकडे पर्याय नाही, असंही मत आठवलेंनी व्यक्त केलं. त्यामुळे शिवसेना-भाजप एकत्र येणार का, या चर्चेस आता जवळपास पूर्णविराम मिळाला आहे.