ऐन सकाळीच मुंबईची पश्चिम रेल्वसेवा तांत्रिक कारणामुळे कोलमडली होती. त्यामुळे कामावर जाणाऱया चाकरमान्यांना तासभर वाहतूकीच्या खोळंब्याला सामोरे जावे लागले.
वांद्रे ते माहिम दरम्यान जलदगती मार्गावर हा तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे जलद गती मार्घावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात आली होती. परिणामी, धीम्या मार्गावरील वाहतूकीवर ताण निर्माण झाला होता.  ऐन सकाळच्या वेळेतच रेल्वेच्या या रडगाण्यामुळे चर्चगेटच्या दिशेने कामावर जाणाऱया चाकरमान्यांच्या वाहतूकीची गैरसोय निर्माण झाली होती.