पश्चिम रेल्वेवर एल्फिन्स्टन स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने लोकल गाड्या उशिराने धावत आहेत.

मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने चाकरमान्यांची तारांबळ उडाली असतानाच बुधवारी संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. लोअर परेल – एल्फिन्स्टन स्थानकादरम्यान शॉर्ट सर्किट झाल्याने गोंधळ उडाला होता. आग लागल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र शॉर्ट सर्किटमुळे स्पार्क झाल्याचे समोर आले. या घटनेनंतर लोकल गाड्यांची वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आल्याचे समजते. यामुळे विरारच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.