पश्चिम रेल्वे
’कुठे? – सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्ग
’कधी? – स. १०.३५ ते दु. ३.३५
’परिणाम – सांताक्रूझ ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही दिशेच्या जलद मार्गावरील वाहतूक बंद राहील. या काळात सर्व लोकलगाडय़ा सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान धीम्या मार्गावरून चालवण्यात येतील.
***
’मध्य रेल्वे
’कुठे? – माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्ग
’कधी – स. १०.०८ ते दु. २.५४
’परिणाम – माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन दिशेच्या जलद मार्गावरून धावणाऱ्या लोकलगाडय़ांची वाहतूक धीम्या मार्गावरून होणार असून या गाडय़ा मुलुंडपर्यंत सर्व स्थानकांवर थांबतील. ठाण्यावरून या गाडय़ा पुन्हा जलदमार्गाने पुढे प्रवास करतील. अप दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकलगाडय़ाही आपल्या निर्धारित स्थानकांबरोबरच मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकोंवर थांबतील. परिणामी दोन्ही दिशेच्या जलद मार्गावरील गाडय़ा निर्धारित वेळेपेक्षा वीस मिनिटे उशिराने धावतील. तर धीम्या मार्गावरील लोकलगाडय़ांची वाहतूकही यामुळे दहा मिनिटे उशिराने होईल.
***
’हार्बर रेल्वे
’कुठे? – पनवेल ते नेरूळ अप आणि डाऊन मार्ग
’कधी? – स. १०.४३ ते दु. ३.२७
’परिणाम – पनवेलहून सीएसटीकडे येणाऱ्या अप लोकलगाडय़ांची वाहतूक पनवेल ते नेरूळ स्थानकांदरम्यान बंद राहील. तसेच पनवेलकडे येणाऱ्या गाडय़ांची वाहतूकही नेरूळ ते पनवेलदरम्यान बंद असेल. ठाण्याहून पनवेलकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्ही लोकलगाडय़ांची वाहतूक नेरूळ ते पनवेलदरम्यान बंद राहणार आहे. तर पनवेल-अंधेरी लोकल सेवाही मेगाब्लॉकमुळे बंद ठेवण्यात येईल. काही खास गाडय़ा सीएसटी ते नेरूळ आणि ठाणे ते नेरूळ दरम्यान चालवण्यात येणार असल्याने गर्दी वाढण्याची शक्यता.