मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोलप्रकरणी हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
- सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून राजकारण रंगू लागले
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- जमिनीच्या वादातून बिल्डरवर गोळीबार; प्रकृती चिंताजनक
- ताडोबाच्या बफरझोनमध्ये वनभ्रमंतीला चालना देण्याची मागणी
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
डोंबिवलीतील महिलांवरील अत्याचाराची मालिका सुरूच असून, मंगळवारी रात्री त्यात आणखी एका संतापजनक घटनेची भर पडली. एका तरुणाने त्याच्या मैत्रिणीचाच भररस्त्यात विनयभंग केला, एवढेच नव्हे, तर तिच्या दुसऱ्या मित्राला आपल्या साथीदारांच्या मदतीने मारहाण केली. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली असून, न्यायालयाने त्यांना बुधवारी जामीन मंजूर केला. छेडछाडीच्या या सततच्या घटनांमुळे पोलिसही हैराण झाले असून, सर्वसामान्य डोंबिवलीकर या असंस्कृत प्रकारांनी सुन्न झाले आहेत. दीपेश सोळंकी (वय १८), संदीप अहिर (वय २०) अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे असून, त्यांत एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. हे तिघे पेंडसेनगरमध्ये नेहरू मैदानाजवळ राहतात. दीपेश नृत्य प्रशिक्षक आहे. त्याची मैत्रीण त्याच्याच संस्थेत नृत्याचे धडे घेते. ती मंगळवारी रात्री आपल्या प्रशांत नार्वेकर या मित्राबरोबर शहरातील चार रस्ता येथे फालुदा खात उभी असताना दीपेश व त्याचे दोन मित्र तेथे आले. त्या वेळी दीपेशने तिला धक्काबुक्की करीत तिचा विनयभंग केला.




















दीपेश सोळंकी (वय १८), संदीप अहिर (वय २०), सचिन शिगवण (२९), अनमोल अतुल जाधवराव (वय २३), थोरात, रिक्षावाले काका —आई वडील कुठे आहेत या सर्वांचे.. वार्यावर सोडलय का? वाचक कुठे आहे? मराठी मराठी करणार्यांनी पहा आपला पराक्रम. पुढे भैय्यांवर नावे ठेवणाऱ्या सेना, ब्रिगेड नि हि नावे लक्षात ठेवावीत.