मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात काम करत असलेल्या धर्माजी काळोखे या हवालदाराच्या पोलीस ठाण्यातील कपाटातून १२ किलो ‘व्हाइट क्रिस्टल’ हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
सातारा पोलिसांनी सोमवारी तो राहात असलेल्या कण्हेरी (जिल्हा-सातारा) गावातील घरावर छापा टाकून ११० किलो ‘एमडी’हा अमली पदार्थ जप्त करून त्याला अटक केली होती. पोलीस हवालदाराकडे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अमली पदार्थ मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर मुंबई पोलिसांनी काळोखेंच्या कपाटातून ‘व्हाइट क्रिस्टल’ पावडर जप्त केली.