वायूपुरवठय़ाअभावी बंद असलेल्या ‘रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रा. लि.’ (आरजीपीपीएल) प्रकल्पातून वीजनिर्मिती होत नसली तरी प्रकल्पाची यंत्रसामुग्री, बँकांचे कर्ज आदींपोटी वर्षांला तब्बल १५०० कोटी रुपयांचा बोजा राज्यावर आला आहे. मात्र या प्रकल्पाची एक युनिटही वीज न वापरताही वीजग्राहकांवर हा भरुदड कशासाठी टाकायचा असा सवाल करत ‘महावितरण’ने दाभोळ वीजप्रकल्पाला पैसे देण्यास ठाम नकार दिला आहे.