चिपळूण येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपास गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही तेव्हा उपस्थित राहणार आहेत.  
समारोपास मनोहर पर्रिकर यांनी उपस्थित राहावे, अशी विनंती संमेलन संयोजन समितीने केली होती. त्या विनंतीस मान देऊन पर्रिकर यांनी समारोपाला येण्याचे मान्य केले आहे.
संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात एकाच वेळी दोन राज्यांचे मुख्यमंत्री प्रथमच उपस्थित राहणार आहेत, असा दावा संमेलन आयोजकांकडून करण्यात आला
आहे.