पूर्व मुक्त मार्गावर शनिवारी रात्री एका भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. आरसीएफ पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात वाहनाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रात्री साडेनऊच्या सुमारास मुक्त मार्गावरून चेंबूरच्या दिशेने निघालेल्या एका वाहनाने मुक्त मार्गाच्या खाली एका महिलेला धडक दिली. या अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला. ही महिला पदपथावर राहणारी असून २५ वर्षांची आहे. आरसीएफ पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंदविला असून त्याचा शोध सुरू आहे.
‘डाएट’चे ८०० शिक्षक तीन महिने विनावेतन
मुंबई: शालेय शिक्षण विभागाच्या चुकीमुळे ३३ जिल्ह्य़ांतील ‘डायट’चे कर्मचारी तीन महिने विनावेतन काम करीत आहेत. ‘जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थां’मधील (डायट) कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळते. २०१३-१४ साठी मिळालेल्या अनुदानापैकी दुसऱ्या टप्प्यातील अनुदान सरकारने वितरीत न केल्याने व त्या संबंधातील उपयोगिता प्रमाणपत्र सादर न केल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.