मरिन ड्राईव्ह येथे सोमवारी समुद्रात बुडून एका महिलेचा मृत्यू झाला. अग्निशमनदलाच्या जवानांनी बुडालेल्या महिलेला संध्याकाळी ४.५५ वाजता बाहेर काढलं. त्यानंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे.रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. महिलेसोबत कोणतीही वस्तू न सापडल्याने अधिक माहिती कळू शकलेली नाही. त्यामुळे हा अपघात आहे की आत्महत्या हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच कळेल, असं पालिकेनं म्हटलं आहे.