देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये दिल्लीपाठोपाठ मुंबई शहराचा क्रमांक लागत आहे. विनयभंग, महिलांवर हल्ले, त्यांचा लैंगिक छळ करणे या प्रकारच्या गुन्ह्य़ांमध्ये मुंबापुरी देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलांचा पाठलाग करण्याच्या घटनांमध्येही महाराष्ट्रातील पुणे, औरंगाबाद पाठोपाठ मुंबई आघाडीवर आहे.

गृह मंत्रालयाच्या नॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्यूरोने जारी केलेल्या क्राइम इन इंडिया २०१५ या अहवालात शहरात घडणाऱ्या गुन्ह्य़ांविषयी माहिती देण्यात आली आहे. यात दिल्ली शहरापाठोपाठ मुंबई शहराचा क्रमांक असल्याचे दिसून येत आहे. २०१४ च्या तुलनेत मुंबई आणि दिल्ली या दोन्ही शहरांमध्ये महिलांविरोधात गुन्ह्य़ांत वाढ होत असून महाराष्ट्रातील इतर शहरेही या अत्याचाराच्या आकडेवारीत झळकू लागल्याचे दिसून येत आहे. पुणे, औरंगाबाद या शहरांमध्येही महिला छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. १.६७ कोटी लोकसंख्या असलेल्या दिल्लीमध्ये वाढत असलेल्या या गुन्ह्य़ांच्या तुलनेत मुंबईत गुन्हांच्या प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त होत आहे.

harrasment-chart