03 December 2016

News Flash

पाण्यासाठी महिलांची मंत्रालयावर धडक

महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. ग्रामीण भागातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठीही मैलोनमैल

मुंबई | February 27, 2013 4:30 AM

महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. ग्रामीण भागातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठीही मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. सोलापूर जिल्ह्यातील पाण्यातील नागरिक गेले चोवीस दिवस पाण्यासाठी आंदोनन करत आहेत. मात्र, सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने आज महिलांनी धडक मोर्चा काढला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी आज दादा-बाबा पाणी द्या, अशी आर्त हाक देत विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. अचानक आलेल्या या मोर्चामुळे सुरक्षा यंत्रणाची तारांबळ उडाल्याचे चित्र विधानभवन परिसरात दिसत होते.

First Published on February 27, 2013 4:30 am

Web Title: women march on mantralaya for water
टॅग Mantralaya,Water