मुंबईहून टांझानियाला जाणाऱ्या एका महिला प्रवाशाकडे तब्बल सात कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडले. हवाई गुप्तचर विभागाने या महिलेला  अटक केली आहे. टांझानियाची नागरिक असलेली ही महिला बुधवारी पहाटे कतार एअरवेजने टांझानियाला जात होती. हवाई गुप्तचर विभागाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिच्या सामानाची तपासणी केली. तिच्या बॅगेत मेथाक्यूलिन हे अमली पदार्थ सापडले. एकूण ७४ किलो वजनाच्या या अमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सात कोटींहून अधिक आहे.