देशातील पहिल्या‘यूटय़ूब स्पेस’चे मुंबईत अनावरण

कला जगासमोर सादर करण्यासाठी एखादा व्हिडीओ चित्रित करून तो यूटय़ूबवर अपलोड करणाऱ्या तरुणाईची संख्या देशात मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. पण असेही अनेक तरुण आहेत की ज्यांना तंत्रयुगात राहूनही चांगल्या साधनांअभावी हे शक्य होत नाही. आपल्या आसपास दडलेल्या अशा कलाकारांना, चित्रकारांना, गृहिणींना त्यांची कला जगासमोर सादर करण्याच्या मागे आता खुद्द यूटय़ूब उभे राहिले आहे. यासाठी त्यांनी अशा कलाकारांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणारी एक हक्काची जागा उपलब्ध करून दिली आहे.
दादासाहेब फाळके चित्रनगरीतील ‘व्हिसिलग वूड्स इंटरनॅशनल’ या माध्यम संस्थेत देशातील पहिली आणि जगातील आठवी ‘यूटय़ूब स्पेस’ गुरुवारपासून खुली झाली आहे. पाककृतींपासून ते बाइक रायिडगपर्यंतचे व्हिडीओ करून ते यूटय़ूबवर अपलोड करायचे आणि लाखो व्हय़ूज मिळवण्याची संधी आता देशातील तरुणांना उपलब्ध झाली आहे. भारतातून यूटय़ूबवर व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. यामुळे देशातील या यूटय़ूबकरांना जोडून ठेवण्यासाठी तसेच देशातील उदयोन्मुख हुशारी जगासमोर येण्यासाठी ही ‘स्पेस’ विनामूल्य उपलब्ध करून दिली जात असल्याचे या वेळी ‘यूटय़ूब स्पेस’चे जागतिक प्रमुख आणि संचालक लान्स पोडेल यांनीस्पष्ट केले. यामुळे यूटय़ूबला जास्तीत जास्त भारतीय निर्माते मिळतील, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. या जागेत यूटय़ूब व्हिडीओ निर्मात्यांना व्हिडीओनिर्मितीच्या प्रशिक्षणापासून ते इतर निर्मात्यांशी व्यावसायिक नाते जोडण्याची संधी मिळणार आहे. याचबरोबर त्या ठिकाणी चित्रीकरण, एडिटिंग आणि यूटय़ूबवर अपलोिडगही करता येणार आहे. यूटय़ूबने आतापर्यंत टोकियो, लॉस एंजेलिस, लंडन, न्यूयॉर्क, ब्राझील आणि बíलन येथे अशा प्रकारची ‘यूटय़ूब स्पेस’ निर्माण करून दिली आहे. तेथील यशानंतर त्यांनी भारतात प्रवेश केला असून ऑगस्ट महिन्यात या संदर्भातील करार झाला होता. या वेळी ‘८८ कीज ऑफ युफोरिया’ या ‘स्पेस’मध्ये तयार केलेल्या व्हिडीओचे अनावरणही करण्यात आले. यूटय़ूब हा व्हिडीओ निर्मात्यांच्या माहितीची पुरेपूर काळजी घेत असल्याचे भारत आणि दक्षिण आशिया विभाग परिसराचे यूटय़ूब भागीदारी विभागचे विभागीय संचालक अजय विद्यासागर यांनी स्पष्ट केले. यासाठी यूटय़ूब व्हिडीओ अपलोड करणाऱ्या वापरकर्त्यांला ‘कंटेट आयडी’ देते. जेणेकरून व्हिडीओ कुणी पाहिला इथपासून तो पाहणाऱ्याने कुठे डाऊनलोड केला व कुठे अपलोड केला इथपर्यंतची माहिती उपलब्ध होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

काय आहे या स्पेसमध्ये
’यूटय़ूब स्टार होण्याची इच्छा असलेल्या कुणालाही येथे प्राथमिक ते अद्ययावत प्रणालींचे प्रशिक्षण दिले जाणार.
’इतर यूटय़ूब कलाकार, निर्माते यांची भेट घडवून दिली जाणार.
’संकल्पना विकसित करण्यासाठी मदत केली जाणार.
’शूटिंगपासून ते एडिटिंगपर्यंतचे अद्ययावत उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार.
वर्षभरात यूटय़ूब व भारत
’यूटय़ूबवर वेळ घालवण्याचे प्रमाण तब्बल ८० टक्क्यांनी वाढले.
’यूटय़ूबवर व्हिडीओ अपलोडिंगचे प्रमाण तब्बल ९० टक्क्यांनी वाढले.
’मोबाइलवर व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्या ५५ टक्क्यांनी वाढली. संगणकाला पिछाडीवर टाकले.