ईडीच्या समन्सला डॉ. झाकीर नाईकचे उत्तर

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) धाडलेल्या समन्सना वादग्रस्त धर्मप्रसारक डॉ. झाकीर नाईकने आपल्या वकिलामार्फत उत्तर दिले आहे. प्रत्यक्ष हजर होण्याबाबत नाईकने काही महिन्यांची मुदत मागून घेतली आहे. या दरम्यान, स्काइप, फोनवरून ‘ईडी’च्या चौकशीला सामोरा जाण्यास तयार आहे, ‘ईडी’ला हवी असलेली सर्व कागदपत्रे, माहिती देण्याची तयारी आहे, असे नाईकने आपल्या उत्तरात म्हटले आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा नोंदवल्यानंतर ‘ईडी’ने नाईकला दोनदा समन्स धाडून चौकशीला प्रत्यक्ष हजर राहाण्यास बजावले होते. अ‍ॅड. महेश मुळे व अ‍ॅड. तारक सय्यद यांनी नाईकच्या वतीने सोमवारी पत्र धाडून समन्सला उत्तर दिले.

मी अनिवासी भारतीय आहे. त्यामुळे ‘ईडी’ने धाडलेले एकही समन्स माझ्या मूळ पत्त्यावर मिळालेले नाही. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी घालण्यात आली. त्याविरोधात दिल्ली व मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी प्रलंबित आहे.

न्यायालयांचे निकाल आल्यानंतर या प्रकरणी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहता येईल. यादरम्यान स्काइप, फोन किंवा अन्य डिजिटल माध्यमांतून ईडीच्या सर्व प्रष्टद्धr(२२४)्नाांना उत्तर देण्याची तयारी आहे, असे पत्र झाकीर नाईकच्या वतीने वकिलांनी ईडीसमोर सादर केले.

दरम्यान, नाईकची बहीण नायला नुरानी व तिचे पती नौशाद या दोघांना ईडीने समन्स धाडून बुधवापर्यंत चौकशीसाठी हजर राहा, असे बोलावले होते. मात्र या दोघांनीही ईडीकडे आठवडय़ाची मुदत मागितली आहे.