विकासकांकडून भरपाई, न्यायालयीन लढाईचे अस्त्र

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही
26 year old youth murdered in bibvewadi
पुणे: बिबवेवाडी येथे तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून

दहा वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना रद्द करण्याच्या दृष्टीने झोपु प्राधिकरणाने हालचाली सुरू केल्या असल्या तरी ज्यांचे काम सुरू होऊन काही कारणास्तव रखडले अशा अपूर्ण झोपु योजना रद्द करताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या योजना रद्द केल्यानंतर विकासकांना द्यावयाच्या नुकसानभरपाईचा तसेच न्यायालयीन लढाईचा प्रश्न कसा सोडवायचा याचा आढावा सध्या घेतला जात आहे. अपूर्ण योजनेतील विकासक तांत्रिक अडचणी पुढे करीत असल्यामुळे या योजना रद्द कशा करायच्या, असा प्रश्न प्राधिकरणाला पडला आहे.

योजना वर्षांनुवर्षे रखडल्याने विकासक म्हणून रद्द का करू नये, अशी विचारणा करणाऱ्या नोटिसा प्राधिकरणाने आतापर्यंत दोनशेहून अधिक योजनांना पाठविल्या आहेत. त्यापैकी २५ योजना रद्द केल्या आहेत. आणखी ७५ योजना रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु या योजनांना सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे अशा योजनांविरुद्ध विकासक बडतर्फी करण्याची कारवाई करणे सोपे आहे. परंतु काही विकासकांनी योजना सुरू केल्या आहेत, मात्र त्या अपूर्ण ठेवल्या आहेत. त्यामध्ये बऱ्याच तांत्रिक अडचणी ते आता पुढे आणत आहेत. अशा वेळी त्यांच्या योजना रद्द कशा करायच्या, असा प्रश्न आहे. योजना रद्द केल्यानंतर त्यांच्याकडून भरपाई मागितली जाण्याची शक्यता असल्याने त्या दिशेने विचार केला जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले. ‘झोपु योजनांना वेग यावा, असा आमचा प्रयत्न आहे. अनेक विकासक योजनांवर फक्त बसून आहेत तर काही विकासक प्रामाणिकपणे योजना राबवीत आहेत. परंतु आलेल्या काही अडचणी सोडविण्यात अडसर आला आहे. अशा बाबींचा विचार करूनच विकासक काढून टाकण्याची कारवाई केली जाणार आहे,’ असे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी सांगितले.

या योजना रद्द

धनश्री डेव्हलपर्स (मागठाणे), दिएसन्स इन्व्हेस्टमेंट अ‍ॅण्ड फायनान्स, कुणाल बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स (पहाडी गोरेगाव), माऊली साई डेव्हलपर्स (कुरार), फ्रिस्कॉन इन्फ्रा (कांदिवली), परेश वालिया अ‍ॅण्ड असोसिएटस्, सिद्धार्थ बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, एसएसव्ही रिएल्टर्स (कांदिवली), बीजय रिएल्टर्स (ओशिवरा), लकी डेव्हलपर्स (दिंडोशी), अमीकृपा लॅण्ड डेव्हलपर्स (वांद्रे), पंक्ती हौसिंग प्रा. लि. (अ‍ॅण्टॉप हिल), लकडावाला डेव्हलपर्स, स्कायलार्क बिल्डकॉन (लोअर परळ), मझसन बिल्डर्स (कुलाबा), रामचंद्र पाटील (मुलुंड), मोरया होम्स (देवनार), मिडास डेव्हलपर्स (कुर्ला), अभिनी डेव्हलपर्स (बोरला, चेंबूर).