* २५ किलो सोने, २५० चांदी लागणार * दोन टप्प्यांत ४५० कोटींची विकास कामे

कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा देवी मंदिर व परिसराच्या विकासाकरिता दोन टप्प्यांत ४५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मंदिरातील गर्भगृह हे सोने-चांदीने मढवणार असून देवीसमोरील भव्य सभामंडपही सुशोभित करण्यात येईल, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन
firing at ram mandir ayodhya
अयोध्या : राम मंदिर परिसरात सुरक्षेसाठी तैनात PAC जवान गोळी लागून जखमी, परिस्थिती गंभीर

मंदिर परिसराचा विकास चार टप्प्यात होणार असून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील १८५.२३ कोटींची कामे सुरू आहेत. विशेष दर्जाच्या लाकडावर चांदी व सोन्याचे काम होणार असून सुमारे २५० किलो चांदी व २५ किलो सोने या कामासाठी लागणार आहेत. देवीचा मुखवटा सोन्याचा, दागिने व आयुधे सोन्याची राहणार आहे. परिसराच्या विकासाकरिता मंदिराचे पुनर्निर्माण आणि मंदिराचा विकास आधी होणे गरजेचे आहे. शासनाने या कामाकरिता ४५० कोटींच्या खर्चाला मान्यता दिली आहे. पैकी १८५ कोटी रुपये दोन टप्प्यात दिले आहे. मंदिर परिसरात भक्तांना निवास, शॉपिंग कॉम्प्लेक्स, पुजारी निवासस्थान, बसस्थानक, वाहनतळ, संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे. शिवाय बोटिंग, तलाव खोलीकरण, गाळ काढणे यासह इतर कामे महानिर्मितीकडून होत आहेत. मंदिराच्या ६ एकर जागेवर अपंग मतिमंद पुनर्वसन केंद्र व वृद्धाश्रमाचे बांधकाम शासन करणार आहे. हे दोन्ही उपक्रम मंदिर ट्रस्टतर्फे चालविण्यात येत आहेत.

पत्रकार परिषदेला संस्थानचे उपाध्यक्ष दयाराम तडस्कर, सचिव केशवराव फुलझेले (महाराज), कोषाध्यक्ष बाबुराव भोयर, विश्वस्त प्रेमलाल पटेल, अ‍ॅड. जी.व्ही. चन्ने , अशोक खानोरकर, नंदू बजाज, स्वामी निर्मलानंद महाराज, अ‍ॅड. मुकेश शर्मा, डॉ. नंदिनी त्रिपाठी, नारायण जामदार, दत्तूजी समरीतकर उपस्थित होते.

मदतीचे आवाहन

मंदिराच्या गर्भगृहाचे काम विश्वस्त समिती करणार आहे. सुमारे १० कोटींच्या कामाकरिता भक्तांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले. दानदात्यांनी त्यांच्या निधीतून होणाऱ्या कामाची माहिती देणार असल्याचेही याप्रसंगी सांगण्यात आले.