निळाई सामाजिक सांस्कृतिक परिवाराच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५वे जयंती वर्ष ‘समता वर्ष’ म्हणून साजरे केले जाणार आहे. त्यानिमित्त ८ ते १४ एप्रिलपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन अभियान राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत विविध विषयांवरील व्याख्याने व परिसंवादाचे आयोजन तसेच विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेअंतर्गत ८ नोव्हेंबरला सीताबर्डी स्थित हिंदी मोरभवन येथे सायंकाळी ६ वाजता ‘गोहत्याबंदीमागचे ब्राह्मणवादी षडयंत्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. अध्यक्षस्थानी प्रा. वामन गवई, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. जावेद पाशा, प्रा. रमेश राठोड या विषयावर विचार व्यक्त करतील. आंबेडकरी जनतेने या कार्यक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन निळाई सामाजिक सांस्कृतिक परिवारातर्फे संयोजक प्रा. प्रवीण कांबळे यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिवस उद्या

प्रतिनिधी, नागपूर</strong>
आदिम साहित्य संगीतीच्यावतीने ७ नोव्हेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिवस कार्यक्रम खरबी चौकातील प्रकाश दुलेवाले यांच्या संविधान सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विकास कुंभारे करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे संचालक चंद्रभान पराते राहतील. सामाजिक कार्यकर्ते रमेश बिजेकर, कुहीतील खंडविकास अधिकारी सुभाष जाधव, कवी प्रकाश दुलेवाले उपस्थित राहणार आहेत. विशेष पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते मंगलमूर्ती सोनकुसरे, बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त मुख्य व्यवस्थापक रामेश्वर बुरडे, सामाजिक कार्यकर्त्यां राधिका हेडाऊ उपस्थित राहणार आहेत.