२ वर्षांनंतरही सुधारणा कासवगतीनेच -डॉ.गुप्ता

महाराजबाग प्राणिसंग्रहालय प्रशासनाला तब्बल दोन वर्षांपूर्वीच प्राणिसंग्रहालयातील सुधारणांची जंत्री सादर केली होती. या काळात या जंत्रीतील एकाही सूचनेचे पालन त्यांनी केले की नाही, याविषयी शंकाच आहे. अतिशय कासवगतीने हे प्रशासन काम करत असून सुधारणा नसल्यागतच आहेत, अशा तीव्र शब्दात केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या चमूने नाराजी दर्शवली. या प्राधिकरणाच्या नियमानुसार प्राणिसंग्रहालय चालवू शकत नसेल, तर इतर सरकारी व खासगी संस्थेला ते चालवायला द्या, असे खडेबोलही त्यांनी महाराजबाग प्रशासनाला सुनावले.

mumbai ramabai ambedkar nagar zopu marathi news
रमाबाई आंबेडकर नगर पुर्नविकास : ‘झोपु’चे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात, पुढील आठवड्यात १६८४ रहिवाशांची प्रारूप यादी प्रसिद्ध करणार
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Eight housing projects on track due to Central government Swamih fund
राज्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांना संजीवनी! केंद्राच्या ‘स्वामीह’ निधीमुळे आठ प्रकल्प मार्गी
Rare Maldhok Bird Chick Born at Conservation Breeding Center in Rajasthan
गंभीर धोक्यातील माळढोकसाठी आशेचा किरण…. जैसलमेरच्या प्रजनन केंद्रात….

महाराजबाग प्राणिसंग्रहालयाची मुदत येत्या ३१ डिसेंबरला संपत असतानाच, सोमवारी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या चमूने महाराजबाग प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. प्राधिकरणाचे मूल्यांकन व संनियंत्रण अधिकारी डॉ. बी.के. गुप्ता यांच्यासह महाराष्ट्र प्राधिकरण प्राणिसंग्रहालयाचे संजय ठाकरे, विभागीय वनाधिकारी नंदकिशोर काळे होते.

प्राणिसंग्रहालयाच्या विकासाचा बृहत आराखडा (मास्टर प्लॅन) प्राधिकरणाला पाठवण्यात हे प्रशासन अपयशी ठरल्याचे वृत्त लोकसत्ताने अलीकडेच प्रकाशित केले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी साडेदहा कोटी रुपयांचा आराखडा प्राधिकरणाला पाठवण्यात आला. त्यानंतर डॉ. बी.के. गुप्ता यांनी महाराजबाग प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी प्राणिसंग्रहालयातील गंजलेले पिंजरे आणि असुविधेबद्दल पाहणीदरम्यानच त्यांनी तीव्र शब्दात महाराजबागेचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर, नियंत्रक डॉ. एन.डी. पत्रावार यांच्यावर तीव्र ताशेरे ओढले. यापूर्वीही प्राधिकरणाचे सदस्य बोनल यांनी प्रशासनाला फटकारले होते. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने ज्या २२ सुधारणांची जंत्री दोन वर्षांपूर्वी या प्राणिसंग्रहालयाला सादर केली होती, त्यात प्राण्यांची नियमित आरोग्य तपासणी व त्याची नोंद, शिक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती, कचरा उचलण्याची यंत्रणा, सुरक्षा भिंत, वन्यप्राण्यांची जोडी, यासह येथे ‘मॉर्निग व इव्हनिंग वॉक’वर बंदी यासारख्या सुधारणांचा समावेश होता. त्यातील सुधारणा झाल्याच नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

पुन्हा एकदा सूचना

प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांचे आरोग्य आणि खानपान व्यवस्था चांगली आहे, पण येथील वन्यप्राण्यांना वातावरण मात्र जंगलाचेच हवे. जंगलात वाघ जेवढय़ा क्षेत्रात वावर करतो, तसेच येथेही असायला हवे. जेवढय़ा नैसर्गिक वातावरणात त्यांना ठेवता येईल, तेवढय़ा नैसर्गिक वातावरणात वन्यप्राणी ठेवण्याचा प्रयत्न करा. लोकांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रम प्राणिसंग्रहालयात व्हायला हवेत. शाळकरी मुलांसाठी विविध कार्यक्रम घेता येतील. दत्तक योजना महाराजबाग प्राणिसंग्रहालयाने सुरू केली असली तरीही त्यासाठीचे पत्रक तयार करून कोणत्या प्राण्यांसाठी किती रुपये आणि दत्तक प्रक्रिया काय, कोणते प्राणी दत्तक घेता येतील, याची सविस्तर माहितीही त्यात असायला हवी, अशा अनेक सूचना यावेळी डॉ.गुप्ता यांनी केल्या.

..अवघी दहा मिनिटे

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे डॉ. बी.के. गुप्ता हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी सहजपणे बोलायला तयार असताना, महाराजबागेचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर यांनी मात्र आडकाठी घालण्याचा प्रयत्न केला. अवघ्या दहा मिनिटात तुम्ही तुमचे प्रश्न विचारा, असे ते म्हणाले. प्राणिसंग्रहालयाचा विकास आणि इतर बाबतीत प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, असे एकीकडे डॉ. गुप्ता बोलत असताना, डॉ. बावस्कर यांनी मात्र दहा मिनिटांची ‘डेडलाईन’ प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.