नागपूरमध्ये देवलापार येथे अनैतिक संबंधांतून ३२ वर्षीय तरुणाने पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलीची हत्या करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घडली आहे. पोलिसांची पथक घटनास्थळावर दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास सुरु झाला आहे. देवलापारमधील तिवारी बोरी येथे बाबू चिंतामण सांगोळे (३२ वर्ष) त्याच्या कुटुंबीयांसोबत राहत होता. शुक्रवारी बाबूने त्याची पत्नी रुपाली (२८ वर्ष) आणि अडीच वर्षाची मुलगी अंशू या दोघांची हत्या केली. या दोघांची हत्या केल्यावर बाबूने स्वतःदेखील आत्महत्या केली. हा प्रकार स्थानिकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. अनैतिक संबंधाच्या संशायातून बाबूने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरु असून अद्याप पोलिसांनी या घटनेविषयी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान हत्या आणि आत्महत्येच्या या घटनेने नागपूर ग्रामीणमध्ये खळबळ माजली आहे. बाबू याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.