भूमाफिया दिलीप ग्वालबंशी याने सामान्य नागरिकच नाही, तर पोलिसांचेही भूखंड हडपल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आतापर्यंत पोलिसांकडे शंभरावर नागरिकांच्या तक्रारी आल्या असून त्यातून ग्वालबंशी हा २००१ ते २००७ या काळात जवळपास ८० एकर शेती व इतर जमिनीचा मालक झाल्याची माहिती समोर येत आहे.

google steps to lay off more employees
गूगलकडून कर्मचारी कपातीचे पाऊल; भारतासह इतर देशांमध्ये काही व्यवसायांचे स्थलांतर करणार
Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
Why was business women Truong My Lan sentenced to death for corruption in Vietnam
भ्रष्टाचाराबद्दल उद्योजिकेला थेट फाशीची शिक्षा… व्हिएतनाममधील घटनेने जगभर खळबळ का उडाली? तेथे मृत्युदंडाचे प्रमाण इतके अधिक का?
india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा

महापालिकेचा कंत्राटदार भूपेश सोनटक्के याच्या आत्महत्या प्रकरणात दिलीप ग्वालबंशी आणि माजी नगरसेवक राजेश माटे यांना मानकापूर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर ग्वालबंशी याने अनेकांचे भूखंड हडपल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या. आतापर्यंत ग्वालबंशी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गिट्टीखदान, मानकापूर आणि कोराडी पोलीस ठाण्यात एकूण सहा गुन्हे दाखल केले. त्यापैकी पाच गुन्हे परिमंडळ-२ च्या उपायुक्तांतर्गत येत असल्याने प्रकरणांच्या तपासावर उपायुक्त राकेश कलासागर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे हे लक्ष ठेवून आहेत. या सहा गुन्ह्य़ांमध्ये ग्वालबंशीने धमकी देऊन भूखंड हडपले. शिवाय महिलांना मारहाण आणि त्यांचा विनयभंग केल्याचेही प्रकार समोर आले आहेत. त्याने सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर पोलीस कर्मचाऱ्यांचेही भूखंड हडपले.

२००१ ते २००७ या काळात त्याने जवळपास ८० ते ९० एकर शेती व इतर जमीन आपल्या नावावर करून घेतल्याची माहिती तपासात समोर आली आहे. यावरून त्याने किती लोकांची जमीन हडपली असेल, याचा अंदाज येऊ शकतो.

तीन नगरसेवकांच्या घरांचीही झडती

आज परिमंडळ-२ आणि गुन्हे शाखेचे सहा पथक तयार करण्यात आले. या पथकांनी बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास दिलीप ग्वालबंशी याच्यासह नगरसेवक नितीश ग्वालबंशी, हरीश ग्वालबंशी, जगदीश ग्वालबंशी यांच्या घराचीही झडती घेतली. त्यांच्या घरांमधून हजारो दस्तावेज ताब्यात घेतले. पोलिसांनी सर्व ग्वालबंशी भावंडांची चौकशी सुरू केली असल्याची माहिती आहे.

सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरून पोलीस कारवाई

दिलीप ग्वालबंशी याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मग पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घ्यायला हवी होती, परंतु केवळ ग्वालबंशी आडनाव असल्याने पोलीस आम्हाला त्रास देत आहेत. राजकीय सूड भावनेतून आणि सत्ताधाऱ्यांच्या इशारावरून पोलीस ही कारवाई करीत आहेत.

नितीन ग्वालबंशीनगरसेवक, काँग्रेस

ग्वालबंशीकडे उत्पन्नाचे स्रोत काय?

दिलीप ग्वालबंशी आणि त्याच्या साथीदारांनी अनेकांना धमकी देऊन भूखंड हडपले. आतापर्यंत अनेक लोकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी सहा तक्रारींमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याशिवाय इतर तक्रारींचा अभ्यास करण्यात येत असून त्यासाठी २५ ते ३० अधिकारी व कर्मचारी या कामी लागले आहेत. आतापर्यंत प्राप्त झालेल्या दस्तावेजावरून दिलीप ग्वालबंशीच्या नावावर ८० ते ९० एकर शेती व इतर जमीन असल्याचे दिसून येते. त्यांच्याकडे उत्पन्नाचे स्रोत नसताना इतकी संपत्ती कशी जमवली, याचा सखोल तपास करण्यात येत आहे. नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात समोर येऊन पोलिसांनी मदत करावी.

राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त.