४ एकरावरील ७५ भूखंड हडपले; ग्वालबंशीनंतर सर्वाधिक तक्रारी

एकदा विक्री करण्यात आलेल्या ४ एकर जागेची पुन्हा विक्री करून तेथील भूखंड हडपल्या प्रकरणात लक्ष्मीरतन बिल्डर्स कंपनीचा संचालक सागर सत्यनारायण रतन (४०) रा. लक्ष्मी निवास, लकडापूल, महाल आणि मिलिंद गृहनिर्माण सोसायटीचे सचिव विकास रामचंद्र जैन (५०) रा. सुमित्रा कुंज, संघ मुख्यालय परिसर, महाल यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध जवळपास ७५ भूखंड धारकांनी एसआयटीकडे तक्रारी दिल्या असून ग्वालबंशीनंतर सर्वाधिक तक्रारी लक्ष्मीरतन बिल्डरविरुद्ध प्राप्त झाल्या आहेत. दोन्ही आरोपींना आज प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर केले असता त्यांना २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

genelia and riteish deshmukh madhuri dixit reach jamnagar for anant ambani pre wedding
अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगसाठी पतीसह पोहोचली माधुरी दीक्षित, तर रितेश-जिनिलीयाला पाहून पापाराझी म्हणाले, “दादा…”
job opportunity in indian coast guard
नोकरीची संधी : इंडियन कोस्ट गार्डमधील संधी
anant ambani and radhika marchant wedding guest will get hand made candle
अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री वेडिंगसाठी जामनगरच का निवडले? ‘या’ शहराशी अंबानी कुटुंबाचा आहे जवळचा संबंध
anant ambani radhika merchant pre wedding
अनंत- राधिकाच्या लग्नासाठी अंबानी कुटुंबात लगबग सुरु, वाचा लग्नपत्रिका ते प्री-वेडिंगपर्यंतची सर्व माहिती

बेसा येथे पहन क्रमांक ३८ अंतर्गत जुने खसरा क्रमांक ४/१ आणि नवीन खसरा क्रमांक ४२ अंतर्गत श्यामलाल मोतीलाल घाटे आणि त्यांच्या दोन बहिणींची नऊ एकर जमीन होती. क्राऊन को-हाऊसिंग सोसायटीने १९८६ मध्ये घाटे यांच्याकडून जमीन विकत घेतली.

त्या ठिकाणी लेआऊट मंजूर करून १७३ भूखंड पाडले. ते संस्थेच्या सभासदांना विकून त्यातून आलेल्या पैशातून प्रथम २ एकराचे विक्रीपत्र केले. त्यानंतर संस्था काळ्या यादीत गेल्याने उर्वरित जमिनीच्या विक्रीपत्राचे काम रखडले. त्यामुळे संस्थेने मिलिंद को-ऑपरेटिव्ह गृहनिर्माण संस्थेशी सामंजस्य करार केला व ४ एकर जमिनीचे विक्रीपत्र करून दिले. या जागेवरील भूखंडांची विक्री क्राऊन आणि मिलिंद संस्थेच्या सदस्यांना करण्यात आली. अशाप्रकारे ६ एकराचे विक्रीपत्र करण्यात आले होते.

१९८८ मध्ये क्राऊन संस्थेला काळ्या यादीतून काढण्यात आले व संस्थेने पुन्हा स्वत:च्याच नावाने विक्रीपत्र केले व स्वत:च्या सदस्यांना भूखंड विकले.

अनेक वर्षे सदस्यांनी जागेवर घर बांधले नाही. त्यावेळी मिलिंद को-ऑपरेटिव्ह गृहनिर्माण संस्थेत मोठे फेरबदल झाले आणि १९८७ मधील कार्यकारिणीतील शाहीदराम उद्धवराव ढोरे यांच्याजागी संदीप विश्वलोचन जैनी , विकास जैन आणि २ इतर पदाधिकारी निवडून आले.

दस्तावेजावर त्यांनी फेरफार करून पुन्हा क्राऊन संस्थेसोबत विकत घेतलेल्या जमिनीचा ताबा घेतला. त्या जागेवर सुरक्षा भिंत बांधली आणि ही जमीन लक्ष्मीरतन बिल्डर्सचे मालक सागर सत्यनारायण रतन यांना ४ कोटी रुपयांत विकली. या प्रकरणात उत्तम माणिकराव पवार रा. मंगलदीपनगर यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु हुडकेश्वर पोलिसांनी यात कोणतीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे पवार आणि इतर सभासंदांनी एसआयटीकडे तक्रार केली. एसआयटीने हुडकेश्वरचा गुन्हा आपल्याकडे वर्ग करून तपास सुरू केला होता.

या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ललित व्हर्टिकर हे करीत असून  मंगळवारी दोन्ही आरोपींना चौकशीकरिता एसआयटी कार्यालयात बोलवण्यात आले होते. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने रात्री उशिरा पोलिसांनी दोघांनाही अटक केली.