नागपूरच्या प्राथमिक फेरीची धडाकेबाज सुरुवात; पहिल्या दिवसात नऊ एकांकिका

विविध विषयांची हाताळणी, रंगभूमीच्या विविध शक्यतांचा विचार करत केलेली मांडणी आणि व्यावसायिक नसले, तरी व्यावसायिकतेने केलेले सादरीकरण यांमुळे नागपूर विभागातील महाविद्यालयीन कलाकारांनी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या प्राथमिक फेरीचा पहिलाच दिवस गाजवला. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित एकांकिका स्पध्रेस गुरुवारी नागपुरात प्रारंभ झाला. ज्येष्ठ नाटय़कर्मी मदन गडकरी यांच्या हस्ते व परीक्षक नरेश गडेकर व श्रीदेवी प्रकाश देवा तसेच स्त्री-शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाल्यानंतर दिवसभरात नऊ एकांकिकांचे सादरीकरण झाले. नागपूर केंद्रातील प्राथमिक फेरीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी नऊ एकांकिका सादर होणार आहेत.

महालमधील दादीबाई देशमुख हिंदू मुलींच्या शाळेत सकाळी नऊच्या सुमारास शहरातील विविध महाविद्यालयांतील

तरुण रंगकर्मी या नाटय़जागरासाठी मोठय़ा उत्साहात सहभागी झाले. महालक्ष्मी जगदंबा महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘मनुशोत्ती’ या नाटकाने आणि अवघ्या दोघांच्या अभिनयाने परीक्षकांचीही उत्कंठा वाढवली. तर पहिल्याच सी. पी. अ‍ॅण्ड बेरार महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘गंध.. एक अनामिक चाहूल’ या नाटकातील विद्यार्थिनींच्या अभिनयाने आयरिस प्रॉडक्शनच्या अभिजीत गुरू व समिधा गुरू यांची मने जिंकली.

सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणारी ही स्पर्धा अस्तित्व या संस्थेच्या मदतीने राज्यभरात होत असून त्यासाठी नॉलेज पार्टनर म्हणून स्टडी सर्कल यांची साथ लाभली आहे. तर रेडिओ पार्टनर म्हणूान ९३.५ रेड एफएम आणि टेलिव्हिजन पार्टनर म्हणून झी मराठी नक्षत्र काम सांभाळणार आहेत. स्पध्रेतील सहभागी विद्यार्थ्यांमधील चांगल्या कलाकारांचा शोध घेता यावा यासाठी आयरिस प्रॉडक्शन या टॅलेन्ट पार्टनरतर्फे अभिजीत गुरू व समिधा गुरू यांची उपस्थिती होती. त्यांनी या कलाकारांना अभिनयाचे विविध बारकावे समजावून सांगितले.

 

आज नगर, रत्नागिरीत

‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहा-विद्यालयीन एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी शुक्रवारी रत्नागिरीत पार पडणार आहे.  ही प्राथमिक फेरी रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलच्या भागोजी कीर सभागृहात होणार आहे.

नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (न्यू टिळक रोड) येथे सकाळी ९.३० वाजता स्पर्धेस सुरुवात होईल. येथील परीक्षक म्हणून श्याम शिंदे, राजेंद्र क्षीरसागर उपस्थित असतील.

 

आज सादर होणारी नाटके

’ सोमवार निकालस महिला महाविद्यालय, नागपूर – ‘मनी वसे.. ते’

’ धरमपेठ सायन्स कॉलेज, नागपूर – ‘बोन्साय’

’ तिरपुडे इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, नागपूर – ‘(सी) ू तारे मून वर’

’ विठ्ठलराव खोब्रागडे, आर्टस् अँड कॉमर्स, नागपूर – ‘विश्वनटी’

’ इंदिरा गांधी आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, वर्धा – ‘मुंबई स्पिरिट’

’ अनुराधा इंजिनीअरिंग कॉलेज, चिखली – ‘ऊलगुलान’

’ धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर – ‘मै फिर लौट आऊँगा’

’ शासकीय अभियांत्रिकी कॉलेज, चंद्रपूर – ‘व्यसन झालं फॅशन’

’ नटवरलाल माणिकलाल दलाल, गोंदिया – ‘ऊठ तरुणा जागा हो’

 

अस्तित्त्व या संस्थेच्या मदतीने राज्यभरात होत असून त्यासाठी नॉलेज पार्टनर म्हणून स्टडी सर्कल यांची साथ लाभली आहे. तर रेडिओ पार्टनर म्हणूान ९३.५ रेड एफएम आणि टेलिव्हिजन पार्टनर म्हणून झी मराठी नक्षत्र काम सांभाळणार आहेत. स्पध्रेतील सहभागी विद्यार्थ्यांमधील चांगल्या कलाकारांचा शोध घेता यावा यासाठी आयरिस प्रॉडक्शन या टॅलेन्ट पार्टनरतर्फे अभिजीत गुरू व समिधा गुरू यांची उपस्थिती होती. त्यांनी या कलाकारांना अभिनयाचे विविध बारकावे समजावून सांगितले.