वृक्ष संगोपनाचे गणित कोलमडले, पर्यावरणावर परिणाम
हिरवे शहर अशी ओळख असलेल्या नागपुरातील हिरवळीचे मूळ आता कमकुवत होत चालले आहे. त्याच्या जोपासनेकडे याच पद्धतीने दुर्लक्ष होत राहिल्यास हिरवळीच्या बाबतीत अग्रक्रमावर असणारे नागपूर शहर शेवटच्या क्रमांकावर फेकले जाईल. एवढेच नव्हे तर पर्यावरणावरही त्याचा मोठा परिणाम होईल, अशी भीती पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसात शहरात अनेक ठिकाणी मोठमोठी वृक्षे कोलमडली. पावसाळयातील सोसाटय़ाचा वारा, गारपीट यामुळे वृक्षांचे कोलमडणे एकवेळ ग्राह्य धरले, तरीही इतर मोसमातील अवघ्या १०-१५ मिनिटांच्या पावसाने वृक्ष कोलमडत असतील तर नक्कीच वृक्षसंगोपणाचे गणित कोलमडले आहे.
शहरात स्त्याच्या दुतर्फा मोठमोठी वृक्षे आणि रस्ता दुभाजकावरसुद्धा महापालिकेच्या उद्यान विभागाने झाडे लावली आहेत. या झाडांना दररोज टँकरने पाणी टाकले जाते, पण विकासाच्या दिशेने शहराची होणारी वाटचाल या हिरवळीसाठी शाप बनत चालली आहेत.
शहरातील रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे. सिमेंटचे रस्ते विकसित शहरांसाठी आवश्यक असले तरीही पर्यावरणासाठी घातक ठरत चालले आहेत. रस्त्याच्या सिमेंटीकरणामुळे वृक्षाच्या मुळाशी पाणी पोहोचत नाही. त्यातच जमिनीची भूजल पातळी खालावत चालली आहे. त्याचाही परिणाम झाडांची मूळे कमजोर होण्यावर होत आहे.
जमिनीवरची माती झाड बांधून ठेवण्यासाठी आवश्यक असताना बांधकामांमुळे ही माती निघून जात आहे. त्यामुळे अनेक वृक्षांवर उधळीसारखे प्रकारही वाढले आहेत. सिमेंटीकरण आणि भूजल पातळी खालावल्याने पाणी आणि मातीअभावी वृक्ष कमजोर होत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावरील वृक्ष वीजवाहक तारांना अडथळा ठरत असल्याने त्याच्या फांद्या कापण्याचे प्रकारसुद्धा घडतात. मोठय़ा फांद्या कापल्यास त्याचाही परिणाम वृक्ष कमजोर होण्यावर होतो.
शहरात दोन दिवस सातत्याने झालेल्या वादळीवारा व पावसामुळे अनेक वृक्षे कोलमडली आणि त्यातील अध्र्याहून अधिक झाडांवर उधळीसारखे प्रकार आढळून आले. सिमेंटीकरण आणि भूजलपातळीचा दुष्परिणाम या झाडांवर झाला आहे. महापालिकेकडून दररोज झाडांना पाणी टाकण्यात येत असले तरीही रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या मोठय़ा वृक्षांना नव्हे तर रस्ता दुभाजकांमधील झाडांना पाणी टाकण्यात येते.
त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांच्या संगोपनाकडे महापालिकेचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. परिणामी अवघ्या १०-१५ मिनिटाच्या वादळीवाऱ्याने ही वृक्षे कोलमडत आहेत.

शहराचा विकास करत असतानाच पर्यावरणाचाही विचार व्हायला हवा. रस्त्याचे सिमेंटीकरण आवश्यक असले तरीही वृक्षाच्या चारही बाजूने अर्धा फूट खोल खड्डे मातीसह मोकळे सोडले पाहिजेत. यामुळे पावसाचे पाणी आत जाईल आणि त्या वृक्षाजवळच्या भूजलपातळीचे प्रमाणही कायम राहील. त्याचवेळी या वृक्षांवर उधळी दूर करणाऱ्या औषधांची फवारणी महापालिकेच्या उद्यान विभागाकडून झाली, तरच शहरातील वृक्ष वाचू शकतील. अन्यथा जराही वादळी वारे आले तर रस्त्यावरील वृक्ष असेच कोसळत राहतील.
– कौस्तुभ चटर्जी, ग्रीन विजिल

gadchiroli naxalite marathi news
दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

उद्यान विभागाकडून रस्ता दुभाजकावरील झाडांची जेवढी काळजी घेतली जाते तेवढीच रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या वृक्षांचीसुद्धा काळजी घेतली जाते. वादळीवाऱ्याने कोसळलेल्या झाडांची माहिती विभागाकडे ठेवली जाते. उधळीच्यासंदर्भात काही तक्रार आल्यास त्यावर औषधांची फवारणी केली जाते. झाडांचे वजन वाढून ते कोलमडत असल्याचे लक्षात आल्यास लगेच फांद्यांची छाटणीसुद्धा केली जाते. एवढेच नव्हे तर एका झाडाला लागलेचा उधळीचा धोका इतरही झाडांवर परिणामकारक ठरत आहे, असे आढळून आल्यास वृक्ष प्रधिकरणाला सांगून ते कापले जाते.
-सुधीर माटे, उद्यान अधीक्षक