पाणी आणि मालमत्ता कर थकबाकीदाराच्या निवासस्थानासमोर ढोलवादन करून गांधीगिरी केल्यानंतर तिसऱ्या दिवशी २ कोटी ६४ लाख १ हजार २९३ रुपये मालमत्ता आणि पाणी करापोटी महापालिकेच्या तिजोरीत आले आहे.

शहरातील एकूण ३ लाख ७० हजार थकबाकीदारांनी ४३२ कोटी रुपये मालमत्ता आणि पाणी कर थकविला आहे. यात मालमत्ता कराची मूळ रक्कम (मुद्दल)२७८ कोटी आहे. (२ लाख २९ हजार ८६९ थकबाकीदार) तर पाणी कराची १८० कोटी आहे. (१ लाख ८८ हजार ग्राहक ) थकबाकीदारासाठी महापालिकेने अभय योजना सुरू केली. पहिल्या दिवशी ११०८ लाभार्थ्यांनी ७६.१२ लाख रुपये मालमत्ता कर तर १२०२ ग्राहकांनी ४० लाख २४ हजार ४१८ रुपये पाणी कर जमा केला. दुसऱ्या दिवशी १२४२ ग्राहकांनी ३२ लाख ४४ हजार २०९ रुपये पाणी कर तर २३२० जणांनी मालमत्ता कर भरला. एकूण २ कोटी ३२ लाख १७ हजार ५०८ कर जमा झाला.

तिसऱ्या दिवशीच ढोलवादन थांबले

थकबाकीदारांच्या घरापुढे ढोलवादन केले जात असल्याने व त्यामुळे होत असलेल्या बदनामीमुळे लोकांनी कर भरणे सुरू केले. त्यामुळे तिसऱ्या दिवशी जाहीर करून कुठल्याही थकबाकीदाराच्या घरासमोर ढोलवादन करण्यात आले नाही.