आरोपी तामिळनाडू राज्यातील सराईत चोर

कॅशव्हॅनमधून १४ लाख रुपये लुटणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना जेरबंद करण्यात धंतोली पोलिसांना यश आले आहे. आरोपी हे तामिळनाडू राज्यातील त्रिची येथील सराईत गुन्हेगार असून ते एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी निघालेल्या व्हॅन लुटण्यातील सराईत गुन्हेगार आहेत.

two accused arrested in Salman Khan house firing case (1)
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक, पोलिसांनी व्हिडीओ केला शेअर
Thane, Police Arrest Two thefts, Involved in 16 Robberies, Recover Rs 17 Lakh, Stolen Goods , theft in thane, robbery in thane, robbery in badlapur, robbery in badlapur,
दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना अटक, ठाणे आणि मुंबईतील १६ गुन्हे उघडकीस
Forest department staff succeeded in imprisoning a leopard that fell into a well
Video : बिबट्याची दोनदा हुलकावणी अन् जेरबंद करण्याचा थरार
Fugitive accused in Mephedrone smuggling case is arrested
आईला भेटायला आला अन् जाळ्यात अडकला; मेफेड्रोन तस्करी प्रकरणात फरार आरोपीला अटक

मंजन ऊर्फ मंजुनाथन श्रीनिवासन आणि कालेय ऊर्फ मूर्ती करुथदुरई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर कुमारन बालसुब्रम्हण्यम, मोहन मनिक्कम, श्रावणन मनिक्कम हे अद्याप फरार आहेत. आरोपींकडून पोलिसांनी १२ लाख ७ हजार ४०९ रुपये रोख जप्त केले असून त्यांच्या खात्यातील ९९ हजार ९०९ रुपये गोठविले आहे. बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये कॅश भरण्याचे काम सिस्को कंपनीला असून ११ जुलै २०१७ ला संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास कॅश हाताळणारा नीलेश चंद्रभान दारोटे (१८) रा. चिखली, कळमना हा झांशी राणी चौकातील एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गाडी थांबवली. त्या एमटीएममध्ये पैसे भरल्यानंतर ते बुटीबोरी येथे गेले असता व्हॅनमधील एका कॅशबॉक्समधील १४ लाख रुपये बेपत्ता आहेत. त्यासंदर्भात त्यांनी धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी तपास केला असता पैसे भरताना कॅशव्हॅन लुटणारी टोळी तामिळनाडू राज्यात सक्रिय आहे. या माहितीच्या आधारावर धंतोली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा मेहंदळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी राजुलवार, कमलाकर गड्डीमे, वीरेंद्र गुळरांधे, सुरेश जाधव, सुशील रेवतकर, विनोद वडस्कर, अश्विनी भामले, रिता कुमरे यांनी तामिळनाडूतील अण्णा टोळीचा शोध घेतला. त्यावेळी अण्णा टोळीनेच नागपुरातील एटीएमची कॅश लुटल्याचे निष्पन्न झाले.