शिक्षण माफियांची मनमानी

खासगी इंग्रजी शाळांचे शिक्षण माफिया सुमार दर्जाचे शालेय साहित्य आणि शाळेत अपुऱ्या दर्जाच्या सुविधा देऊन चिमुरडय़ांची अक्षरश: ससेहोलपट केली जाते. मात्र, याविरुद्ध पालक ‘ब्र’ ही उच्चारू शकत नाही. बोटावर मोजण्याइतके पालक मुलांच्या शाळा बदलतात. मात्र, बहुतेक पालक निमूटपणे ही पिळवणूक सहन करीत असतात.

Nashik Education Department, Steps Up Efforts, Increase Voter, Turnout Through SVEEP Initiative, Systematic Voters Education and Electoral Participation program, students,
उन्हाळी सुट्टीतही एसव्हीईईपी उपक्रमासाठी धडपड
Career After 12th Medical courses after twelfth in Marathi
Career After 12th : बारावीनंतर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात करियर करायचेय? मग ‘या’ अभ्यासक्रमांमध्ये घेऊ शकता प्रवेश
complaints can be made by keeping name confidential in savitribai phule pune university
पुणे : नाव गोपनीय ठेवून करता येणार तक्रार
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भाषा असलेल्या इंग्रजी शिकवणाऱ्या खासगी शिक्षण संस्थांनी पद्धतशीरपणे पैसा कमावण्यासाठी उपयोग केला असून त्यासाठी भरमसाट शुल्क आकारणीबरोबरच शालेय वस्तूही शाळेतूनच खरेदी करण्याचा अट्टाहास धरतात. मात्र, शालेय वस्तूंची गुणवत्ता तपासायला गेले तर त्यातील फोलपणाही लगेच लक्षात येतो. आधीच्या भागांमध्ये नमूद केलेल्या शालेय वस्तूंमध्ये गणवेश, पुस्तकांबरोबरच जेवणाचा डब्बा, बास्केट, जोडे, मोजे, स्वेटर, ड्रॉईंग सिटस्, स्कूल बॅग या सर्व वस्तू शाळेतूनच खरेदी कराव्यात, असा संस्थांचा कटाक्ष असतो. मात्र, या वस्तू घेताना त्याच्या गुणवत्तेविषयी प्रती प्रश्न विचारण्याची सोय नसते. उलट त्या वस्तू सहा महिन्यांत खराब होऊन पालक पुन्हा त्या आपल्याच शाळेतून कशा घेतील, याचीच काळजी या नामांकित शाळांकडून वाहिली जाते. प्रतिष्ठेच्या व त्या त्या वस्तूंची दुकाने आणि शाळा यांचे आधीच संगनमत असल्याने पालक आणि दुकानदारांचे कमिशन अशी दुहेरी नफा शाळा कमावतात.

महापालिकेच्या शाळेतून जशा मोफत सायकल किंवा शिलाई यंत्रे विद्यार्थ्यांना वाटली जातात आणि काही दिवसांतच त्याचे पितळ उघडे पडते. कधी कधी पायडल तुटून पडते तर कधी हँडल हातात येते. अगदी तसाच अनुभव या सीबीएसई किंवा खासगी इंग्रजीच्या नामांकित शाळांमधून मिळणाऱ्या शालेय वस्तूंच्याबाबत असतो. अर्थात त्याला अपवाद असलेल्या शाळाही आहेत, हे सांगायलाच हवे. मुलांना यावर्षीचा गणवेश पुढील वर्षी लहान होणे समजू शकतो पण, अगदी त्याचे धागे निघून त्याचे पोतेरे होऊन ते सहा महिन्यातच घालण्याच्या पलीकडे जाते. काही शाळांमध्ये माहिती पत्रकातच वस्तू कुठे मिळतील, त्या दुकानाचे नाव दिलेले असते. अर्थात गणवेशाच्या रंगात फरक येऊ नये, हा जरी शाळांचा हेतू असला तरी त्याच्यासाठी दोन ते अडीच हजार घेणे हे कितपत योग्य आहे. पालकाला एकच गणवेश घ्यायचा नसतो तर दिवसागणिक आणि वेगवेगळे साजरे होणारे दिवस यांना अनुसरून ते घ्यावे लागतात.

शाळांची मुजोरी एवढी असते की शाळेतील पुस्तके ठरावीक काळातच विकत घ्या, असा आग्रह असतो. पालक रांग लावून ती घेतात. दोन मुले असतील तर नवरा-बायको रांगेत उभे राहून ती घेतात. कार्यालयात जायचे असेल तर कोणीतरी बदली कामगार त्याठिकाणी उभा केला जातो. त्या त्या वर्गाचा पुस्तकांचे गठ्ठा असतो. रांगेत राहून पुस्तके मिळण्याच्या खिडकीजवळ गेल्यावर अर्धीच पुस्तके पालकांच्या हाती येतात. बाकी पुस्तके शाळा सुरू झाल्यावर घ्या, असे सांगितले जाते. पैसे मात्र पूर्ण घेतले जातात. पालकांना बोलण्याची मुभा तेथे नसतेच. शिवाय इतर पालकही बाजू उचलून धरत नाहीत.

बाहेरून दिसणारी पंचतारांकीत शाळा आतमध्ये मात्र असुविधांनी बरबटलेली असते. आपण जरी तीन ऋतू मानत असलो तरी विदर्भातील मुख्य ऋतू उन्हाळा आहे. तो आठ महिने असतो. अशा वातावरणात विद्यार्थ्यांना पंखे नसल्याने घामामध्ये निथळत असतात. पालक त्रागा व्यक्त करण्यापलीकडे काही करू शकत नाहीत. आठवडय़ातील एक दिवस शाळेत कराटे किंवा इतर खेळांसाठी राखून ठेवला जातो. चिमुरडय़ांना पूर्ण दिवस कराटे ड्रेसमध्ये विना पंख्याने ठेवले जाते. शाळेतून घरी जाताना शाळेचा गणवेश तेवढा असतो, अशी अगतिकता एका पालकाने व्यक्त केली. एकूण पैसा जेथून येईल, तेथे डोळा असलेल्या या शिक्षण संस्थांतून शिक्षण कोसो दूर गेलेले आहे.

दप्तराचे ओझे वाढले

एका नामांकित शाळेत तिसरीत शिकत असलेल्या पाल्याच्या पालकांना या सुमार साहित्याचा फारच मनस्ताप झाला. त्यांच्या मुलीला शाळेतून स्कूल बॅग मिळाली. त्याला एकच चेन होती. दुसरा कप्पा नव्हता. त्यापूर्वी मुलगी जेवणाचा डब्बा आणि पाण्याची बाटली घेऊन जाण्यासाठी वेगळी बॅग असायची. मात्र, यावर्षी त्यांनी एकच बॅग दिली. त्या शाळेतील मुख्याध्यापक स्वत: वर्गात गेले आणि जेवणाचे डबे, पाण्याची बाटली, ड्राईंग शिट सर्व एक त्र कोंबून भाजीच्या पिशवीप्रमाणे ती स्कूल बॅग मुलाच्या हाती दिली. मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे वाढले.

पालकांचा प्रश्न

‘सीबीएसई’शी संलग्नित एका इंग्रजी शाळेत सहावीत मुलगा असलेल्या पालकाने शाळेत स्वच्छतेचा अभाव असल्याचे सांगितले. व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात संवादाचा अभाव असल्याचे त्यांच्या लक्षात आले. वर्गात ४० विद्यार्थी आहेत आणि शाळेत जवळपास ५०० विद्यार्थी आहेत. तीन मजल्याच्या या शाळेत तळमजल्यावर चार वर्ग आहेत. अशा शाळांची तपासणी होत नाही का, असा निरागस  प्रश्न त्यांनी उपस्थित केला.