ठाकरे यांचा अप्रत्यक्ष आरोप

पक्षाने ज्यांना सर्व काही दिले, तेच नेते भाजप वरिष्ठ नेत्यांच्या इशाऱ्यावर काँग्रेसला फोडण्याचे कम करीत आहेत, अशा शब्दांत शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी  काँग्रेस नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना लक्ष्य केले. निमित्त होते माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे. देवडिया भवनात हा कार्यक्रम रविवारी पार पडला.

sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
sangli Mahavikas Aghadi
मविआची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर होताच कॉंग्रेस संतप्त, बैठकीत पुढील निर्णय – आमदार सावंत
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार

संजय महाकाळकर यांना पायउतार करीत महापालिकेतील गट नेतेपद तानाजी वनवे यांच्याकडे गेल्यानंतर पहिल्यांदा ठाकरे यांनी चतुर्वेदी यांच्यावर निशाना साधला. ते म्हणाले, पक्षामुळे सत्ता भोगलेले नेते आता वैयक्तिक स्वार्थासाठी प्रदेशाध्यक्षावर शाईफेक प्रकरण घडवून आणून अपमानित करून लागले आहेत. हेच नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या इशारावर आपल्या बंगल्यात बसून काँग्रेसविरोधी षडयंत्र रचत आहेत. ते काँग्रेसला कमकुवत करीत आहेत. अशा नेत्यांपासून कार्यकर्त्यांनी सावध राहावे, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

शहराध्यक्षपद एका गटाला आणि महापालिकेतील गट नेतेपद दुसऱ्या गटाकडे असल्याने काँग्रेसचे दोन गट समोरासमोर आल्याचे पडसाद पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमातही उमटले. शहर काँग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमापासून पहिल्यांदाच महापालिकेतील गटनेते दूर राहिले. तानाजी वनवे अजनी चौकातील कार्यक्रमात सहभागी झाले. होते. काँग्रेसमध्ये गट नेतेपद आणि स्वीकृत सदस्यांवरून दोन गट पडले आहेत. सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत आणि अनीस अहमद या माजी मंत्र्यांनी एकत्र येऊन महापालिकेतील काँग्रेसमध्ये फूट पडली. वनवे हे गटनेते झाले असून स्वीकृत सदस्य आणि शहराध्यक्ष पदावर मुत्तेमवारविरोधी गटात डोळा आहे. पक्षांतर्गत सुरू असलेल्या ‘दंगल’ची पाश्र्वभूमीवर राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी साजरी झाली. शहरातील विविध झालेल्या कार्यक्रमात पक्षातील या दुफळीचे दर्शन घडले.

शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या आपल्या समर्थकासह देवडीया भवनात श्रद्धांजली कार्यक्रम घेतला. यासंदर्भात वनवे म्हणाले, अजनी चौकात राजीव गांधी यांच्या पुतळ्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. महापालिका कार्यालय रविवारी बंद राहत असल्याने विरोधी पक्ष कक्षात शनिवारी श्रद्धांजली वाहण्यात आली.

सत्तेचा दुरुपयोग करून शिक्षण संस्थांच्या नावे जमिनी हडपल्या आणि बट्टा आयोगाने त्यांच्यावर दोषारोष केले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावे. या नेत्यांविरुद्ध पक्षाने देखील कारवाई करावी, असेही विकास ठाकरे म्हणाले.