सलग ५३ तासांच्या पाककलेचा जागतिक विक्रम

जयजसे घडय़ाळाचे काटे पुढे सरकत होते, तसतशी उत्सुकता शिगेला पोहोचत होती. सायंकाळी ५.३० वाजले आणि नोगपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांची ५३ तासांची शाकाहारी पदार्थाची अन्नपूर्णा साधना पूर्ण झाली. सभागृहात एकच जल्लोश सुरू झाला. अमेरिकेतील बेंजामिन पेरी यांच्या नावावर असलेला सलग ४० तास पाककलेचा जागतिक विक्रम मोडून मनोहर यांनी ५३ तासांचा या क्षेत्रातील नव्या जागतिक विक्रमाची नोंद केली होती.

उत्तर अंबाझरी मार्गावरील इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात शुक्रवारी सकाळी विष्णू मनोहर यांनी त्यांच्या जागतिक विक्रमाला सुरूवात केली होती. रविवारी सांयकाळी ५:३० वाजता तब्बल ५३ तास त्यांनी विविध पदार्थ तयार करून नवा जागतिक विक्रम नोंदवला. रव्याचा शिरा आणि मोदक तयार करून सुरू केलेला हा प्रयोग रविवारी ५३ व्या तासाला शेवटी चना डाळीचा हलवा आणि झुनका भाकर करुन समारोप केला. तत्पूर्वी रविवारी पहाटे ३ वाजता त्यांनी यापूर्वीचा या क्षेत्रातील ४० तासाचा विक्रम मोडला. तेव्हा सभागृहात असलेल्या हजारो उपस्थितांनी एकच जल्लोश केला होता. त्यानंतर विष्णू यांनी स्वतचा नवा विक्रम स्थापन करण्याकडे वाटचाल सुरू केली. एक-एक करीत वेगवेगळ्े पदार्थ तयार केले जात होते. एक हजार पदार्थाचे  उदिष्ट होते. शेवटी तो ७५० झाल्यावर त्यांनी विश्वविक्रमाला गवसणी घातली. दरम्यान आज सुटीचा दिवस असल्याने  विष्णू यांचा विश्वविक्रमी प्रयोग पाहण्यासाठी सकाळपासून शहरातील खवय्यानी आणि विष्णूच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. उपस्थितांच्या मनोरंजनाचीही व्यवस्था येथे होती. डिजेवरील गाण्यांवर लोकाचे पाय थिरकत होते.  ५३ तासाच्या पाककलेनंतर विष्णू मनोहर यांनी आभार मानले. यावेळी विष्णू मनोहर यांचे वडील आणि आई, पत्नी अपर्णा आणि त्याचे भाऊ आणि प्रवीण आणि प्रफुल आणि मैत्री परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

विष्णू यांनी तयार केलेले पदार्थ

  • २०० प्रकारचे भात
  • ३५० प्रकारचे स्नॅकस
  • २५० प्रकारचे गोड पदार्थ
  • १२० प्रकारचे बेकरी प्रकार
  • १५० प्रकारचे वेगवेगळे सुप
  • १७५ प्रकारच्या चटणी कोथींबीर

विक्रम अन्नदात्याला समर्पित

४० तासाचा अमेरिकेतील बेंजामिन पेरी यांचा जागतिक विक्रम मोडून स्वतचा ५३ तासाचा विक्रम हा मी अन्नदाता  शेतकऱ्यांना समर्पित करतो. शाकाहरी पदार्थाचा संदेश जगभरात पोहचविण्यासाठी हा उपक्रम केला आहे. सर्वाच्या प्रोत्साहनामुळे हे शक्य झाले.   – विष्णू मनोहर

डापाककलेत विश्वविक्रम करून विष्णू मनोहर यांनी जगभरात शाकाहरी पदार्थ पोहचविण्याचे मोठे महान कार्य केले.त्यांचा  ५३ तासाचा विक्रम कोणीही मोडू शकणार नाही. विष्णू मनोहर आता विश्वव्यापी शेफ झाले आहेत.     – विठ्ठल कामत, प्रसिद्ध उद्योजक