प्रसिध्द रंगकर्मी व कला दिग्दर्शक अरूण रहाणे (५७) यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शकुंतला, मुलगा प्रसाद व राहुल यांच्यासह दोन सुना आहेत.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!

सोमवारी सकाळी रहाणे यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. कुटुंबियांनी त्यांना कॉलेज रोडवरील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतांनाच त्यांचे निधन झाले. नाशिकच्या कला क्षेत्राला नेपथ्य रचनेच्या माध्यमातून नवा आयाम देणाऱ्यांपैकी एक अशी रहाणे यांची ओळख. कमीत कमी वस्तुंचा वापर करत नेटकी मांडणी करतांना त्यांची भव्यता तसेच गांभीर्य जपले पाहिजे ही हातोटी मेहनतीने त्यांनी प्राप्त केली होती. नाशिकच्या रंगमंचापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास नेपथ्य रचनेमुळे राज्यात सर्वदूर पोहोचला. वेगवेगळ्या महोत्सवांसह, महाकवी कालिदास कला मंदिरातील जनस्थान पुरस्कार अन्य महत्वपूर्ण पुरस्कारांसाठी सेट तयार करणे असो वा राज्य नाटय़ स्पर्धेसाठी नेपथ्य रचना व अन्य जबाबदारी रहाणे यांनी लिलया पेलली. त्यांनी अनेक नाटके, चित्रपट व मालिकांमध्ये कला दिग्दर्शक म्हणून काम पाहिले. २० नाटके व ५० चित्रपटात कला दिग्दर्शक म्हणून त्यांनी विविध सेट्सची उभारणी केली. यामध्ये तीन हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. दिवंगत राजीव पाटील यांच्या समवेत सावरखेड एक गाव, जत्रा, कवडसा, बकुळा नामदेव घोटाळे, तोची एक समर्थ, सनई चौघडे, राजमाता जिजाऊ, ब्लाईंड गेम हे त्यांचे कायम लक्षात राहणारे चित्रपट आहेत. माध्यम जगतांतील तीनही माध्यमांमध्ये मुशाफिरी करणाऱ्या रहाणे यांनी स्थानिक कलावंत आणि रंगमंचाशी नाळ कायम ठेवली. नाशिकच्या कलावंताना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या ठिकाणी चित्रनगरी तयार व्हावी, यासाठी त्यांचे अथक प्रयत्न सुरू होते. रहाणे यांच्या आकस्मित निधनाने कला क्षेत्रावर शोककळा पसरली. सायंकाळी अमरधाम येथे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सांस्कृतीक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.