24 September 2017

News Flash

भाजप म्हणतो, होय आम्ही तिकीटासाठी पैसे घेतले पण….

पक्षाच्यावतीने या निधीचा हिशोब आयोगाला सादर केला जाणार आहे.

नाशिक | Updated: March 21, 2017 5:20 PM

BMC Election Nasik : उमेदवारांच्या सार्वत्रिक प्रचारासाठी पक्षनिधी म्हणून प्रत्येकी दोन लाख रुपये पक्षाकडून घेण्यात आले आणि त्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चात सदर रक्कम समाविष्ट केली जाणार आहे, असा कबुलीवजा खुलासा सानप यांनी आचारसंहिता कक्षाला पाठविला आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीतील उमेदवारीकरिता दोन लाख रुपये घेतानाच्या व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओप्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी उमेदवारांकडून पैसे घेतल्याची कबुली लेखी खुलाशातून दिली असून हा पैसा पक्षाच्या प्रचारासाठी वापरण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. उमेदवारांच्या सार्वत्रिक प्रचारासाठी पक्षनिधी म्हणून प्रत्येकी दोन लाख रुपये पक्षाकडून घेण्यात आले आणि त्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चात सदर रक्कम समाविष्ट केली जाणार आहे, असा कबुलीवजा खुलासा सानप यांनी आचारसंहिता कक्षाला पाठविला आहे.

VIDEO: भाजपचा ‘पारदर्शक कारभार’; २ लाख द्या, तिकीट घ्या

पक्षाच्यावतीने या निधीचा हिशोब आयोगाला सादर केला जाणार आहे. काहीजणांकडून रोकड स्वरूपात घेतलेल्या पैशांबाबत आयोगाकडून त्यांना पुन्हा विचारणा केली जाण्याची शक्यता आहे. तिकीटवाटप करताना भाजप कार्यालयामध्ये दोन लाख रुपये प्रत्येक उमेदवाराकडून मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे पक्षाच्या अब्रूचे राज्यभर धिंडवडे उडाले होते. या व्हिडिओमुळे भाजपची चांगलीच दाणादाण उडाली होती. त्यानंतर तिकिटासाठी पैसे घेतल्याचा आरोप पक्षातीलच काही नाराजांनी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला, त्यानंतर याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी,  यांनंतर याप्रकरणी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेली तक्रार हा घटनाक्रम एकामागोमाग एक असा सुरूच होता. शरद आहेर यांच्या तक्रारीची  दखल घेत आचारसंहिता विभागाने आमदार सानप यांना नोटीस बजावत खुलासा करण्याचे आदेश दिले होते. यानंतर सानप यांनी आयोगाकडे खुलासा सादर केला. या खुलाशातून उमेदवारांकडून दोन- दोन लाख रुपये घेतल्याची कबुली देताना हा निधी पक्षाच्या प्रचारासाठी वापरणार असल्याचा दावा सानप यांनी केला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षाकडून सामूहिक खर्च केला जाणार असून याकरिता हा निधी खर्च केला जाणार असल्याचे सानप यांनी खुलाशात म्हटले आहे. हा खर्च मुदतीमध्ये आयोगाकडे सादर केला जाईल असेही स्पष्टीकरण त्यांनी आयोगाच्या सरिता नरके यांच्याकडे दिले आहे.

First Published on February 17, 2017 12:56 pm

Web Title: bjp give explanation to election commission about demanding money for party ticket in nashik
 1. उमेश मोंडकर
  Feb 17, 2017 at 9:44 am
  अबकी बार गाजर सरकार! फडणवीस आणि मोदी दोघेही स्वतःला कृष्ण समजत असल्यामुळे ते करतील त्या लीला आणि बाकी करतील ते चाळे! मुख्यमंत्र्यांच्या भाषेत सांगायचे तर भाजपच्या बँकेत पैसे टाकले तर त्याचा अनेक पट परतावा मिळेल.आता हे दोन लाख रुपये तिकीट मिळवण्यासाठी दिलेलं टोकन आहे. मूळ रक्कम करोडोत असणार.त्याच्या किती पट परतावा देणार फडणवीस साहेब? बिच्चारे शेतकरी बांधव! त्यांना आधी माहित असते की गाजराच्या शेतीत एवढा फायदा आहे तर ते बाकीच्या गोष्टी पिकवण्याच्या फंदात पडलेच नसते.बर त्यात गाजर फक्त दाखवून चालते.
  Reply
  1. M
   manya
   Feb 17, 2017 at 7:37 am
   आपले भाजप सरकार, गाजरे दमदार
   Reply
   1. N
    nishant
    Feb 17, 2017 at 8:49 am
    व्हिडीओ क्लिप सारख्या पुराव्याने वरवंटाचं घुसल्यामुळे आता सत्य काबुल करावे लागत आहे. आधी किती वेळा पैसे घेतले...त्याचे हिशोब सादर केले का? नो उल्लू बनाविंग.
    Reply
    1. P
     Pravin
     Feb 17, 2017 at 10:16 am
     सगळंच कसा पारदर्शक :) नाही म्हणायला तोंड कुठे आहे आता ..गिरे तो भी टांग उपर
     Reply
     1. R
      rajendra
      Feb 17, 2017 at 8:14 am
      हा सगळं व्यवहार टेबलावरून झाला आहे म्हणून ह्यालाच तर पारदर्शिकता म्हणतात, इतर पक्ष उमेदवार तिकीट ऑक्शन ला ठेवून उमेदवारांकडून कोटी कोटी लुटतात आणि जर का तो उमेदवार अश्याच भ्रष्ट मार्गाने निवडून आला तर तो ती सगळी रक्कम आपल्यासारख्या जनतेकडून भ्रष्ट मार्गाने सव्याज वसूल करतो...!
      Reply
      1. R
       Ramesh Sarang
       Feb 17, 2017 at 4:39 pm
       म्हणजे सर्व उमेदवारांकडून कमीतकमी दोन लाख घेतले आहेत. त्यांचा बँक खात्यातून काढली किंवा नाही ते तपासले पाहिजे.
       Reply
       1. R
        Raj
        Feb 18, 2017 at 6:23 am
        इनकम टॅक्स डिपार्टमेंट सामान्य नागरिकांना sms व मेल पाठवून त्रास देताय! हिम्मत असेल तर या उमेदवारांची चौकशी करावी!
        Reply
        1. S
         satish
         Feb 17, 2017 at 9:38 am
         हा तर निर्लज पानाचा कळस झाला ... गिरा तो टांग उपर ओह गाजर वाले ....
         Reply
         1. S
          shrikant
          Feb 17, 2017 at 8:22 am
          बंगारू लक्ष्मणला सुद्धा रंगेहात पकडले होते. त्याच्या अनुभवावरून मोदीशहा भाजपने आता असं कोणी पकडल्यावर 'हो घेतले होते' असं कबूल करून पुढे हे कसं अधिकृत आहे हे सांगायचे ठरवले आहे. 'निर्लज्ज सदासुखी' !
          Reply
          1. S
           Siddhesh
           Feb 17, 2017 at 1:38 pm
           अंध भक्त नाही..हा त्यांचा व्यवसाय आहे! भा ज प च्या समर्थनार्थ प्रतिक्रिया खरडल्या नाहीत तर त्यांना रोजंदारी मिळणार नाही! ह्या २ लाखातील काही भाग ह्यांचा पगार देण्यासाठी वापरला जातो.
           Reply
           1. S
            Siddhesh
            Feb 17, 2017 at 8:11 am
            छोटा चे दात पारदर्शक झाले!
            Reply
            1. S
             Shriram
             Feb 17, 2017 at 8:11 am
             यात काहीच आक्षेपार्ह नाही. शिळ्या कढीला ऊत आणण्याचा लोकसत्ताचा केविलवाणा प्रयत्न.
             Reply
             1. A
              AMIT
              Feb 17, 2017 at 9:28 am
              तुमच्या प्रतिक्रियेतही नवे काही नाही . निर्लज्जपणे स्वपक्षाची पाठराखण करायची आणि लाचखोरी केली तरी काहीच झाले नाही याचा आव आणायचा. तुम्हाला सारासार विचार करण्याची क्षमता आहे कि विकून खाल्ली ती सुद्धा ?
              Reply
              1. A
               AMIT
               Feb 17, 2017 at 9:29 am
               पैसे हे भाजपा चे उच्च ध्येय असल्याने त्यांनी विकलेल्या तिकीटाची काँग्रेस शी तुलना करता येत नाही.
               Reply
               1. S
                sanjay telang
                Feb 17, 2017 at 4:48 pm
                भाजपावाले किती मूर्ख आहेत एवढेच कळते ह्या प्रकरणातून. आणि बाकीच्यांचा शहाणपणा वादातीत आहे ह्याची जाणीव होते. वर्षानु वर्षे अनेक पक्षांनी अनेक मार्गानी खाऊन पण हूं कि चू होत नाही आणि भाजप वाल्याना अजूनही फासावे लागते, म्हणजे त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. खरोखर 'पार्टी विथ डिफरेन्स' .
                Reply
                1. V
                 Vikram
                 Feb 17, 2017 at 12:50 pm
                 BJP चा पारदर्शक पानाचा खा फाटला आहे
                 Reply
                 1. Load More Comments