नाशिकच्या पर्यटनाला नवा आयाम देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करत गंगापूर धरण परिसरात साकारलेला बोटिंग क्लब अनेकदा मुहूर्त जाहीर होऊनही सुरू होऊ शकलेला नाही. महामंडळाची उदासीनता, राजकीय श्रेयवादाची लढाई, पर्यावरणप्रेमींचा विरोध आणि नैसर्गिक संकटे यामुळे बोटिंग क्लब नागरिकांच्या सेवेत रुजू होऊ शकलेला नाही. यामुळे दिवाळीच्या हंगामात तरी क्लब खुले करण्याचा मुहूर्त लागतो का, याकडे सर्वाचे लक्ष आहे.

गंगापूर धरण परिसरात पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन बोटिंग क्लब सुरू करण्याचा निर्णय पर्यटन विकास महामंडळाने घेतला. तत्कालीन पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. क्लबचे काम सुरू झाल्यानंतर परदेशी तसेच स्वदेशी बनावटीच्या ४० हून अधिक बोटींची खरेदी झाली. त्यासाठी खास निधी मंजूर करत तेथे येणाऱ्या पर्यटकांसाठी निवासी संकुलासह खाद्यगृह यासह अन्य सेवा सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून व्यवस्था झाली.

24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
Amul dominates the Mumbai milk market
मुंबईच्या दूध बाजारपेठेवर ‘अमूल’चे वर्चस्व
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

त्या अनुषंगाने धरण परिसरात संकुले उभी राहिली. सारं काही जुळून आले असताना निवडणुकांचे बिगुल वाजले आणि त्याचे श्रेय घेण्यासाठी क्लबच्या उद्घाटनाचा औपचारिक सोहळा रुपेरी दुनियेतील कलावंताच्या उपस्थितीत पार पडला. यानंतर क्लब सर्वसामान्यांना खुले होईल, अशी अपेक्षा असताना बोटिंगचा आवाज तसेच पर्यटकांचा वावर यामुळे स्थलांतरित पक्षी धरण परिसरात येणार नसल्याचे सांगत पर्यावरणप्रेमींनी विरोध केला. मधल्या काळात महामंडळाने पुन्हा एकदा क्लबचे रीतसर उद्घाटन सोहळा करत तो सर्वसामान्यांना खुले करण्याचा प्रयत्न केला.

त्या वेळी बोटींच्या खरेदीत झालेल्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. तसेच बोटी बराच काळ पडून राहिल्याने त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न होताच. यामुळे हा मुहूर्तही हुकला. मधल्या काळात मार्च-एप्रिलमध्ये उन्हाळी सुटी व त्या दृष्टीने होणारे पर्यटन पाहता पुन्हा एकदा महामंडळाने प्रयत्न सुरू केले.

तथापि, दुष्काळी स्थितीत धरण परिसरात आवश्यक जलसाठा नसल्याने ते प्रयत्नही फसले. पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने महामंडळ क्लब खुला करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, वरिष्ठ पातळीवरून निर्णय होत असल्याने आजतागायत हे काम रखडले आहे. मंत्रालयातून हिरवा कंदील न मिळाल्याने क्लब सुरू करण्याचा मुहूर्त लांबला आहे. मुंबई येथील वरिष्ठ अधिकारी सतीश सोनी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. मात्र क्लब कधी सुरू होणार याबाबत काही सांगण्यास असमर्थतता व्यक्त केली.