प्रतिनिधी, नाशिक
ज्या अभिमानाने ‘आपलं नाशिक. माझं नाशिक’ हे नाशिककरांकडून सांगितले जाते, त्याच आत्मीयतेने नाशिकची खाद्यसंस्कृती जोपासण्यासाठी, खाद्यसंस्कृतीत लुप्त होणारी नाशिकची ठळक वैशिष्टय़े पुन्हा एकदा नाशिककरांसमोर आणण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि विश्वास सहकारी बँक यांच्या वतीने ६ ते ८ मे या कालावधीत सायंकाळी ‘नाशिक चौपाटी’अंतर्गत शहराच्या खाद्यसंस्कृतीची चटकदार सफर करता येणार आहे.
नाशिकच्या खाद्यसंस्कृतीची ओळख पर्यटकांनाही व्हावी, या उद्देशाने विश्वास सहकारी बँकेने पर्यटन विकास महामंडळाच्या मदतीने ‘नाशिक चौपाटी’ची अनोखी संकल्पना मांडली आहे. सावरकरनगर येथील विश्वास लॉन्स येथे हा उपक्रम होईल. अलीकडेच विश्वास बँकेने मिसळ महोत्सवाचे आयोजन करत विविध चटकदार मिसळ एकाच छताखाली उपलब्ध केल्या होत्या. त्यास खवय्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाशिक चौपाटीच्या माध्यमातून त्यापुढील एक पाऊल टाकण्यात आले आहे. महोत्सवाची फलश्रुती पाहता नाशिककरांना अनोखा खाद्य नजराणा पेश करण्यासाठी तसेच खवय्यांना मेजवानी देण्यासाठी नाशिकची खाद्य परंपरा ज्यांनी ५० वर्षांहून अधिक काळ जपली, ते सर्व खाद्यपदार्थ आणि विक्रेत्यांना एकत्रीत करत नाशिकची चौपाटी बहरणार आहे. त्यात अतिथ्यचा जिभेवरच विरघळणारा दहिवडा, पालक चाट, बटाटेवडा, नंदन स्वीट्सचे मसालेदार असे विविध चाट्स, विजूची दाबेली आणि सॅण्डविच, कुलकण्र्याची चमचमीत पावभाजी, सराफ बाजारातील दराडेमामांचा मसाले वडा, टिपिकल पॉट आइस्क्रीम, हेरंब फुड्सचे अफलातून खरवससह मसाला डोसा, ढोकळा चाट, मूंग भजी, चना चटपटा, बुढ्ढी के बाल, बर्फ का गोला, नागपुरी वडी, स्ट्रॉबेरी कॉफी अशा चटकदार, बहारदार, चवदार पदार्थाचा यात समावेश आहे.
नाशिक चौपाटी उत्सवात नाशिककरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक विश्वास ठाकूर आणि महामंडळाच्या प्रज्ञा बडे-मिसाळ यांनी केले आहे. उत्सवाच्या अधिक माहितीसाठी स्वप्निल राका (९८२२५९९०००), विवेकराज ठाकूर (९०२८०८९०००) यांच्याशी संपर्क साधावा.

Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
saraswati River civilization,
यूपीएससी सूत्र : भारतातील प्राचीन सरस्वती-घग्गर संस्कृती अन् पाकिस्तानच्या बंदरात चीनचं गुप्तहेर जहाज, वाचा सविस्तर..
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा
Prepared primary textbooks in 52 vernacular languages of 17 states so that students have access to all study materials in their mother tongues
आपल्या बोलीतून शिकता यावे म्हणून..