सुरगाणा तालुक्यातील सह्य़ाद्रीच्या पूर्वेकडील सातमाळा रांगेत असणाऱ्या हतगड किल्ल्यावर दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी पर्यटकांनी किल्ल्यांच्या मूळ सौंदर्यावर ओरखडे ओढत परिसरात कमालीची अस्वच्छता केल्याचे प्रकर्षणाने जाणवले. वन विभाग आणि पुरातत्त्व विभाग यांच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे प्रतिष्ठानने म्हटले आहे.

banana in 15 thousand hectares of garden dried up in Jalgaon and solapur due to summer heat
उन्हाच्या झळांचा केळीला फटका; जळगाव, सोलापुरात १५ हजार हेक्टरवर बागा सुकल्या
Torrential rain with hail in Shirol and Hatkanangle taluka
शिरोळ, हातकणंगले तालुक्यात गाऱ्यांसह वळिवाची दमदार हजेरी; उन्हात गरव्याची सुखद अनुभूती
Property worth lakhs was robbed in two house burglaries in nashik
नाशिक : जिल्ह्यात दोन घरफोडींमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास
Bhandara, Youth Murdered, Body Burn, Destroy Evidence, Enmity, garada village, lakhani taluka, police, crime news, marathi news,
भंडारा : वैमनस्यातून तरुणाची हत्या; पेट्रोल टाकून जाळला मृतदेह…..

दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानने जिल्ह्यातील २४ हून अधिक किल्ल्यांची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. याआधी साल्हेर, मुल्हेर, विश्रामगड, रतनगड, हरिश्चंद्रगड, दहेरी, हरिहर आदी किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नुकतीच हतगड किल्ल्याच्या खालील भागात असणाऱ्या पुष्पाताई हिरे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, विजयकुमार घोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी विद्यार्थ्यांना किल्ल्याचा इतिहास सांगण्यात आला. गुजरातच्या सरहद्दीवर समुद्रसपाटीपासून ३६०० फूट उंचीवर किल्ल्याची बांधणी झाली आहे. त्याच्यावर जाण्यासाठी कातळ खोदीव पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराजवळ दुर्मीळ शिलालेख असून हा किल्ला दाक्षिणात्य राष्ट्रकुटांनी बांधल्याचे लक्षात येते. वरच्या भागात पठाराची तटबंदी मोडकळीस आली आहे. परिसरात पाण्याची अनेक बारमाही तळी आहेत तर किल्ल्याच्या पश्चिमेला पिराचे स्थान आहे. किल्ल्यावर पाच दरवाजे व नऊ बुरूज बघावयास मिळतात. या ठिकाणी हस्तमान ऋषींचे वास्तव्य असल्याची आख्यायिका आहे. हा गड पहारेकरी गड म्हणूनदेखील ओळखला जातो. ५ जानेवारी १६७१ मध्ये मराठय़ांनी साल्हेर घेतल्यावर शिवाजी राजे यांनी स्वत हा किल्ला ताब्यात घेतला. शिवरायांचा इतिहास सांगणाऱ्या किल्ल्याची सद्यस्थिती बिकट आहे. वन विभागाचे काही प्रयत्न सुरू असले तरी ते अपुरे असून कोणताही वन कर्मचारी या ठिकाणी कार्यरत नसल्याचे दिसून येते. किल्ल्यावर फेरफटका मारताना विद्यार्थी व प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना परिसरात कमालीची अस्वच्छता आढळून आली. पर्यटकांनी सोबत आणलेल्या खाद्यपदार्थाची पाकिटे, खाद्यपदार्थ, पिण्याच्या पाण्यासह मद्याच्या बाटल्या, कचरा, झाडाचा पालापाचोळा मोठय़ा प्रमाणावर पडलेला होता. विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी दोन तास श्रमदानाद्वारे किल्ल्यावरील धान्य, शस्त्र, दारूगोळा साठवणुकीसाठीच्या कोठीघरांच्या परिसराची साफसफाई केली. किल्ल्यावरील नैसर्गिक साधन संपत्तीची माहिती अजित जगताप, पक्षीमित्र भीमराव राजोळे, सागर घोलप आदींनी दिली.

गुजरातकडील हतगड किल्ल्याच्या मूळ सौंदर्याला बाधा येईल अशी कृती घडत आहे. याबाबत वनसंयुक्त कृती समिती, प्रशासन आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गडावर स्वच्छता अभियान, पर्यटकांची नोंद आदी उपक्रम हाती घेतल्यास या गैरप्रकारांना आळा घालता येईल.  प्रा. आनंद बोरा, अध्यक्ष, दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान