शहरात ठिकठिकाणी निघालेल्या स्वागतयात्रा.. त्यात वैविध्यपूर्ण वेशभूषेत सहभागी झालेले बालगोपाळ.. कुठे लेझीमच्या तर कुठे टाळ-मृदुंगांच्या तालावर धरला गेलेला ठेका.. फटाक्यांची आतषबाजी अन् पुष्पवृष्टीने केले जाणारे स्वागत.. पाडव्यानिमित्त रंगलेल्या गायकांच्या मैफली.. अशा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मंगळवारी मराठी नववर्षांचे स्वागत अभूतपूर्व उत्साहात करण्यात आले. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात घराघरांतही गुढय़ा व तोरणे उभारून गुढीपाडवा साजरा करण्यात आला.

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]

ram kadam rohit pawar
Video: फडणवीसांना संपवण्याची धमकी, रोहित पवारांचा फोन आणि बारामती कनेक्शन; सत्ताधाऱ्यांचे विधानसभेत गंभीर आरोप!
rain in Vidarbha
सावधान! येत्या ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता
Ajit Pawar group
विविध समूह घटकांचा विश्वास संपादन करण्यावर अजित पवार गटाचा भर
ncp chief sharad pawar slams BJP
“भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजपा बरा..”, शरद पवार यांची टीका

गुढी पाडवा अन् नववर्ष स्वागत यात्रा हे समीकरण उत्तर महाराष्ट्रात रूढ होऊ लागले आहे. नाशिकमध्ये या दिवसाचा बाज काही वेगळा असतो. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत यात्रांमधील सहभागी होणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे दिसले. एरवी भल्या सकाळी निघणाऱ्या यात्रा यंदा बहुतांश ठिकाणी तासाभराच्या विलंबाने म्हणजे आठ वाजता निघाल्या. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हिंदू नववर्षांचे स्वागत करण्यासाठी शहरातील अनेक मंडळी सरसावली. नगरसेवकांनी आपापल्या भागांचे नियोजन केले. आ. सीमा हिरे यांनीदेखील यात्रेत हजेरी लावली. वेगवेगळ्या भागातून ढोलताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आल्या. रस्त्यावर सडा संमार्जन करत रंगीत रांगोळी रेखाटण्यात आली. काही ठिकाणी फुलांची उधळण करत यात्रांचे स्वागत झाले. लहान मुले-मुली, युवती आणि महिला पारंपरिक वेशभूषेत यात्रांमध्ये सहभागी झाले. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’सह वेगवेगळे सामाजिक संदेश देणारे चित्ररथही सहभागी झाले.

गंगापूर रोड, नाशिकरोड, नवीन नाशिक, गोदा किनाऱ्यावरून शोभायात्रा काढण्यात आली. नाशिककरांनी खास पारंपरिक पेहराव करत सहभाग नोंदविला. बालगोपाळही मागे राहिले नाहीत. संत, महंत तसेच राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेत चित्ररथात विराजमान झालेल्या चिमुरडय़ांनी सर्वाचे लक्ष वेधले. काही ठिकाणी शोभायात्रेत अश्वारूढ शिवाजी, राणी लक्ष्मीबाईंच्या वेशभूषेत मुले-मुली सहभागी झाले. ढोल-ताशा पथकाने नववर्षांनिमित्त सलामी देत अनेकांना तालावर थिरकण्यास भाग पाडले. लेझीम आणि ढोल ताशाचा गजर सुरू असतांना महिला वर्गाने फुगडय़ा खेळत भजनाच्या ठेक्यावर ताल धरला. काही भागात महिला व पुरूषांची एकत्रित अशी दुचाकी फेरीही निघाली. शोभायात्रेतील लक्षवेधी पेहराव, चित्ररथ तसेच यात्रा मार्गातील आकर्षक गुढय़ांना पारितोषिक देत सन्मानित करण्यात आले. सर्वत्र उत्सवाचा माहोल असताना घराघरात त्याची तसूभरही कमतरता राहिली नाही. अमावस्या संपल्यानंतर गुढय़ा उभारण्यात आल्या. त्यासाठी खास महावस्त्र, शेला, जरीचे कापड याने सजविलेल्या गुढीचे विधिवत पूजन करण्यात आले. दरम्यान, सातपूर येथे सायंकाळी यात्रेत बारा गाडय़ा ओढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली होती. या कार्यक्रमांना होणारी गर्दी लक्षात घेऊन आयटीआय सिग्नल ते सातपूर गाव दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात आली.

नवीन मराठी शाळेत शैक्षणिक गुढी

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने शतक महोत्सव तसेच नवीन मराठी शाळेचा हीरक महोत्सव याचे औचित्य साधत नवीन मराठी शाळेत मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक यांच्या हस्ते शैक्षणिक गुढी उभारली. सर्व विद्यार्थ्यांना सुख, आरोग्य, विद्या, बळ, आयुष्य, बुद्धी, संपत्ती मिळो अशी प्रार्थना करण्यात आली. संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

[jwplayer pqdTtL1f-1o30kmL6]