मनसेचा आंदोलनाचा इशारा

तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरातून जमा केलेला घनकचरा काही वर्षांपासून मुंबई-आग्रा महामार्गालगत टाकण्यात येत असून कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा कचरा डेपो बंद करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दसरा-दिवाळीपूर्वी हा डेपो न हलविल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
proposal for widening of uran to panvel road
उरण-पनवेल मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव, नवघर फाटा ते बोकडवीरा पोलीस चौकीपर्यंत चौपदरी मार्ग
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
Traffic Causes Jam, continuous Holidays, Tourists Head, Lonavala, Mumbai Pune Expressway, marathi news,
सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी, उन्हाळ्यामुळे मुंबईतील पर्यटक लोणावळ्यात दाखल

घोटी शहरातून संकलित करण्यात आलेला घनकचरा काही वर्षांपासून घंटागाडय़ांच्या माध्यमातून महामार्गाच्या कडेला टाकण्यात येतो. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात न आल्याने तसेच पावसामुळे हा कचरा सडला आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात दरुगधी येत आहे. यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना नाक-तोंड दाबूनच पुढे जावे लागत आहे.

या ठिकाणाजवळ सर्व बाजूंना नागरी वस्ती वाढल्याने कचऱ्याच्या दरुगधीचा त्यांना सर्वाधिक त्रास होत आहे. दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचऱ्यामुळे डासांच्या प्रादुर्भावात वाढ झाली असून यामुळे साथीचे आजारही झपाटय़ाने वाढत आहेत.

सध्या नाशिक जिल्ह्य़ात स्वाइन फ्लू, डेंग्यूची साथ सुरू आहे. याकडेही मनसेने लक्ष वेधले आहे. काही कुत्री या कचऱ्यामध्ये अन्न शोधण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्यांच्याकडून कचरा अधिकच पसरविला जात आहे. केंद्र आणि राज्य शासन देशभरात स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवीत असताना घोटीजवळील महामार्ग याला अपवाद ठरत आहे.

हा कचरा डेपो या ठिकाणाहून हलविण्याची मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार अनिल पुरे यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

शिष्टमंडळात मनसेचे जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, तालुकाप्रमुख मूलचंद भगत, उपतालुका अध्यक्ष भोलेनाथ चव्हाण, मनविसे तालुका अध्यक्ष प्रताप जाखेरे आदींचा समावेश होता.

घोटी शहर दिवसेंदिवस वाढत असून नागरी वस्ती महामार्गापर्यंत पसरली आहे. असे असताना शहरातील घनकचरा महामार्गालगत टाकण्यात येतो. यामुळे महामार्गालगत असणाऱ्या नागरी वस्तीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डासांचा प्रादुर्भाव व दरुगधी यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाल्याने महामार्गालगत घनकचरा टाकणे बंद करण्याची गरज आहे.

रतनकुमार ईचम ,जिल्हाध्यक्ष मनसे