दिवाळीमधील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्वेक्षण

दिवाळीच्या काळात शहरात फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता दोन वर्षांच्या तुलनेत काहीशी कमी झाली असली तरी ध्वनी पातळीबाबतच्या निर्धारित निकषांपेक्षा ती अधिक असल्याची बाब महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या ध्वनिमापनाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. वाणिज्य क्षेत्रात सर्वसाधारणपणे दिवसा ६५ डेसिबल तर रात्री ५५ डेसिबल आणि निवासी क्षेत्रात दिवसा ५५ तर रात्री ४५ डेसिबलचा निकष आहे. लक्ष्मी पूजनच्या दिवशी सीबीएस आणि नाशिकरोडचे बिटको (वाणिज्य क्षेत्र) या क्षेत्रात अनुक्रमे सरासरी ७३.९ आणि ७२.४ डेसिबल इतकी पातळी होती. दुसरीकडे निवासी क्षेत्रात समाविष्ट असलेल्या पंचवटीत सरासरी ६९.४, दहीपूल ६६.८ आणि सिडको ६४.५ डेसिबल आवाज असल्याचे निष्पन्न झाले. जनजागृतीमुळे यंदा फटाके उडविण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी ध्वनिप्रदूषण मात्र कायम राहिले.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
hepatitis disease (1)
‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय
Shani Vakri 2024
जूनपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? शनिदेव वक्री अवस्थेत बलवान होताच १३९ दिवस मिळू शकतो अपार पैसा
Dog Shot By Police Officer Over 30 Times
धक्कादायक! पोलीस अधिकाऱ्याने कुत्र्यावर झाडल्या ३० पेक्षा जास्त गोळ्या, तरीही वाचला त्याचा जीव; काय आहे प्रकरण?

दिवाळीच्या कालावधीत आवाजाच्या तीव्रतेचे मोजमाप करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे शहरात ठिकठिकाणी ध्वनी पातळी मोजण्याची मोहीम घेण्यात आली. या काळात सकाळी सहा ते रात्री बारा या कालावधीत फटाके वाजविण्यास परवानगी आहे. फटाक्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या काही विशिष्ट रासायनिक घटकांवर बंदी घालण्यात आली. अशा घटकांचा अंतर्भाव असणाऱ्या फटाक्यांचा वापर किंवा विक्री झाल्यास ही बाब नियमांचे उल्लंघन या सदरात मोडू शकते, असा इशारा आधीच पोलिसांनी दिला होता. दरवर्षी ध्वनीची पातळी मोजण्याची प्रक्रिया धनत्रयोदशीच्या दिवसापासून सुरू होते. पुढील काही दिवस सलगपणे काही विशिष्ट भागात ही तपासणी केली जाते. ध्वनीची पातळी सर्वसाधारणपणे ५५ ते ६० डेसिबलपर्यंत असते. शहरातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या कारणांमुळे या पातळीत चढ-उतार होत असते. अधिकाधिक ८० डेसिबलपर्यंतचा आवाज सहन केला जावू शकतो. त्या पुढील तीव्रतेचा आवाज मात्र सहन करण्यापलीकडे जातो.

दिवाळीत फटाक्यांमुळे ही पातळी १०० डेसिबलच्या पुढे जाऊ शकते. फटाक्यांच्या प्रकारानुसार ११० ते १२० डेसिबलपर्यंतच्या आवाजास शासनाने संमती दिली आहे. या संदर्भातील नियमांचे उल्लंघन करताना कुणी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेला आहे. दुसरीकडे फटाकेमुक्त दिवाळीसाठी जनजागृती झाली. त्याचे सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही सीबीएस, पंचवटी, दहीपूल, बिटको चौक आणि सिडको या भागात फटाक्यांच्या आवाजाचे ध्वनीमापन करण्यात आले. लक्ष्मीपूजन व तत्सम दिवशी प्रमुख बाजारपेठांमध्ये पाच ते दहा हजारांच्या माळांवर अधिक भर असल्याने हा परिसर आवाजाने दुमदुमून जातो. निवासी भागात आवाजापेक्षा ‘फॅन्सी’ प्रकारांना पसंती दिली जाते. ‘नॉइज मीटर’च्या सहाय्याने मापनाचे हे काम करण्यात आले. त्याबाबतची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिली. २०१५ व २०१६ मधील आकडेवारी पाहिल्यावर ध्वनी प्रदूषणाची पातळी कमी होत आहे. परंतु, निर्धारित मर्यादेहून अधिक आवाजाची पातळी कायम राहून ध्वनी प्रदूषण झाल्याचे दिसून येते.

तीन वर्षांतील आकडेवारी

पंचवटी परिसरात २०१५ मध्ये लक्ष्मी पूजनच्या दिवशी सरासरी ७८.५, २०१६ मध्ये ७०.५ आणि या वर्षी ६९.४ डेसिबल. दहीपूल परिसरात २०१५ मध्ये ७९.५, २०१६ मध्ये ७०.२ आणि यंदा ६६.८ डेसिबल. सिडको परिसरात २०१५ मध्ये ७९.६, २०१६ मध्ये ७३.८ आणि यंदा ७२.७ डेसीबल. बिटको चौकात २०१५ मध्ये ६४.५, २०१६ मध्ये ७१.३ आणि यंदा ७२.४ डेसिबल अशी ही आकडेवारी आहे.