मैत्रेय रिअल्टर्स अ‍ॅण्ड प्लॉटर्स स्ट्रक्चर्स प्रा. लि. कंपनीकडून देण्यात आलेले धनादेश वटत नसल्याच्या तक्रारी गुंतवणूकदारांकडून करण्यात येत असल्याच्या पाश्र्वभूमीवर अशा गुंतवणूकदारांनी तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
‘मैत्रेय’ च्या मुख्य संचालिकावर्षां सत्पाळकर व जनार्दन परुळेकर यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्य़ात चार फेब्रुवारीच्या मध्यरात्री गुन्हे शोध पथकाकडून सत्पाळकर यांना अटक करण्यात आली. त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने आठ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सत्पाळकर यांना कोठडी मिळाल्याने मैत्रेयच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतविलेल्यांसह एजंटांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अधिक परतावा मिळण्याच्या आमिषाने हजारो गुंतवणूकदारांनी मैत्रेयमध्ये पैसे गुंतविले आहेत. परंतु गुंतविलेले पैसे परत देण्यात कंपनीकडून टाळाटाळ होऊ लागल्याने हवालदील झालेल्या सहा गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. कंपनी गुंतविलेल्या पैशांचा पोलिसांकडून शोध घेणे सुरू झाले असून त्यासंदर्भात शनिवारी पालघर जिल्ह्य़ातील माणिकपुरी येथील कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला. कार्यालयातील काही कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतली.
मैत्रेय रिअल्टर्स अ‍ॅण्ड प्लॉटर्स स्ट्रक्चर्स प्रा. लि. कडून १४ डिसेंबर २०१५ रोजी २७ लाख गुंतवणूदारांपैकी ११,१४,१६४ गुंतवणूकदारांना ८०४ कोटी रुपयांपैकी ७६३.३२ कोटी रूपये परत करण्यात आले असल्याची माहिती मैत्रेय ग्रुपच्या संचालकांकडून शासनास पत्राव्दारे दिली आहे. परंतु धनादेश वटत नसल्याचा अनुभव गुंतवणूकदारांना येत आहे. त्यामुळे धनादेश वटले नसतील त्यांनी तक्रार व जबाबासाठी संपर्क साधण्याचे आवाहन सरकारवाडा पोलिसांनी केले आहे.

Give time to employees to drink water every 20 minutes health department advises companies
दर २० मिनिटांनी पाणी पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ द्या, आरोग्य विभागाकडून कंपन्यांना सूचना
millions of old vehicles running on pune road no re registration after fifteen years
पुण्यातील रस्त्यावर लाखभर जुनी वाहने! पंधरा वर्षे होऊनही पुनर्नोंदणी नाही
Rajinder Pal Kaur
“भाजपात सहभागी होण्यासाठी ५ कोटींची ऑफर”, आप आमदाराची पोलिसात तक्रार; गुन्हा दाखल
complaint filed against me in cbi ed by using sim card and aadhaar card chhatrapati sambhajinagar police commissioner manoj lohiya
“आपल्याविरुद्ध सीबीआय, ईडी, ठाण्यात तक्रार दाखल” बनावट फोन, लिंक पाठवण्याचे प्रकार निदर्शनास, पोलीस आयुक्तांची माहिती