नाशिकरोड येथील शिखरेवाडी-अंधशाला बसस्टॉपजवळ काल (रविवारी) मध्यरात्री झालेल्या भीषण कार अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. काल रात्री दीडच्या सुमारास अंधशाला बसस्टॉपजवळ वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ही कार रस्त्याच्या मध्ये असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात ‘रिपांई’च्या प्रीती भालेराव, पूजा भोसले, सूरज बिरजे आणि निशांत बागुल हे चार जण जागीच ठार झाले. तर रितेश विश्वकर्मा, आनंद मोजाड हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; ३ ठार, १२ जखमी
पुणे एक्स्प्रेस वेवर बोरस गावच्या हद्दीत भरधाव ट्रकने खासगी बसला मागून जोरदार धडक दिली. आज सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. त्यात तीन प्रवासी ठार झाले. तर १२ जण जखमी झाले आहेत. बोरस गावाजवळ ही बस थांबली होती. त्यावेळी मागून आलेल्या भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रक रस्त्यावर थांबलेल्या बसला धडकला. यात बसमधील तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. तर १२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना निगडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.