*  पाच गटांवर भाजपचे यश, शिवसेनेला केवळ दोन गट *  पंचायत समितीत सेना-भाजप समान यश * जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक  

तालुका पंचायत समितीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट कौल न देता मतदारांनी मागील निवडणुकीतील निकालाची पुनरावृत्ती केली. शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या साम्राज्याला येथे धक्का पोहोचला आहे. जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील सात गटांपैकी शिवसेनेला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. त भाजपने पाच जागा जिंकल्या आहेत. तर पंचायत समितीच्या १४ पैकी सत्ताधारी सेना व प्रतिस्पर्धी भाजपला प्रत्येकी सहा जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी व अपक्षाने प्रत्येकी एक जागा पटकावली. या स्थितीत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष यांना अनन्यसाधारण महत्व आले आहे.

bjp rajput voters in up
उत्तर प्रदेशमध्ये भाजपा अडचणीत! तिकीट वाटपावरून राजपूत समुदाय पक्षावर नाराज
AAP leader Atishi accused the central government of a conspiracy of President rule in Delhi
दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचा कट! ‘आप’च्या नेत्या आतिशी यांचा केंद्र सरकारवर आरोप; भाजपचे प्रत्युत्तर
vina vijayan ed case
मुख्यमंत्र्यांच्या मुलीवर ईडीची कारवाई; केरळमध्ये काय घडतंय?
chhatrapati sambhajinagar, central minister bhagwat karad
दीड वर्षे मेहनत करुन राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या पदरी निराशा

तालुक्याच्या राजकारणातील वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दादा भुसे आणि भाजप नेते अद्वय हिरे या दोघांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. अनेक ठिकाणी तिरंगी लढती असल्याने पंचायत समितीमधील शिवसेनेची सत्ता हस्तगत करण्यात भाजपला यश येते की नाही याबद्दल मोठी उत्कंठा निर्माण झाली होती.

जाहीर झालेल्या निवडणूक निकालानंतर मात्र आता पंचायत समितीच्या बाबतीत कुणाला काठावरही पास होता आलेले नाही. मागील निवडणुकीत सात जागा जिंकून अपक्षाच्या मदतीने पाच वर्षे पंचायत समितीमधील सत्ता कायम राखणाऱ्या शिवसेनेची यावेळी अवघ्या सहा जागा मिळवतांना मोठी दमछाक झाली.

स्पष्ट बहुमत न मिळाल्याने इतर मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित असलेले पंचायत समिती सभापतीपद मिळविण्यासाठी भाजप व सेना या दोन्ही पक्षांची आता कसोटी लागणार आहे. जिल्हा परिषदेत गतवेळी चार जागा मिळविणाऱ्या सेनेची यावेळी दोन जागांपर्यंत झालेली घसरगुंडी आणि भाजपने पाच जागांवर मारलेली मुसंडी ही राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

वडनेर गटात शिवसेनेचे राजेंद्र सोनवणे (११,२९१) यांनी भाजपचे श्रावण पवार (१०,८८७) यांचा, तर झोडगे गटात सेनेचे दादाजी शेजवळ (१०,६२०) यांनी भाजपचे भरत वाघ (१०,१८३) यांचा पराभव केल.

दाभाडी, निमगाव गटात भाजपचे यश

‘जाऊ बाई जोरात’ अशी लढत रंगल्यामुळे अत्यंत चर्चेत आलेल्या आणि तितक्याच प्रतिष्ठेच्या झालेल्या दाभाडी गटात भाजपने यश मिळवले. भाजपच्या संगीता संजय निकम (१०,०६९ मते) यांनी आपल्या थोरल्या जाऊ व सेनेच्या उमेदवार विद्या अशोक निकम (८,४८८ मते) यांचा पराभव केला. राष्ट्रवादीच्या अंजना संजय देवरे यांना केवळ ३,८८५ मते मिळाली. सौंदाणे गटात मनिषा पवार(१०,४७१ मते) यांनी राष्ट्रवादीच्या पुष्पा देसाई (७,५८७) यांचा पराभव केला. सेनेच्या वैशाली पवार (७,५६९) तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या.

निमगाव गटात भाजपचे जगन्नाथ हिरे (९,८३६) यांनी सेनेचे मधुकर हिरे (७,९४२) यांचा पराभव केला. रावळगाव गटात समाधान हिरे (१२,४९७) यांनी सेनेचे रमेश अहिरे (९,७४९) यांचा पराभव केला. बहुचर्चित कळवाडी गटात बलवीरकौर गिल (१२,१०३) यांनी सेनेच्या अंजली कांदे (१०,०७२) यांचा पराभव केला. सेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्या अंजली या पत्नी आहेत.