गणेशोत्सव मंडळांसाठी पालिकेतर्फे एक खिडकी योजना

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानग्यांसाठी महापालिकेत एक खिडकी योजना कार्यान्वीत करण्यात येणार आहे. तसेच उत्सव काळात निर्माल्य संकलनासाठी पालिका निर्माल्य कलशांची संख्या वाढ करून स्वछतेबाबत काळजी घेईल. गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी गणेशभक्तांनी कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करावी. त्यासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढविली जाईल, असे महापौर रंजना भानसी यांनी सांगितले.

Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Cyber Criminal, Small Amount Fraud, target, Cyber Police, Maharashtra, Unwilling to Register, small fraud cases,
सायबर फसवणुकीच्या हजारो तक्रारींची नोंदच नाही; कोट्यवधी रुपये गुन्हेगारांच्या घशात
Panvel water
‘पिण्यासाठी पाणी द्या, मग पाणी बचतीचा संदेश द्या’

नाशिक महापालिकेच्यावतीने शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची बैठक महापौरांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यालयातील सभागृहात पार पडली. यावेळी सभागृह नेते दिनकर पाटील,अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, गटनेते संभाजी मोरुस्कर, प्रभाग सभापती डॉ. हेमलता पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रारंभी आपल्या अडचणी मांडल्या. तात्पुरत्या वीज जोडणीसाठी घेतली जाणारी अनामत रक्कम वीज कंपनी लवकर देत नाही. ही रक्कम लवकर मिळणे आवश्यक असून ती कमी करण्याचा मुद्दा काहींनी मांडला. परंतु, हा विषय पालिकेशी संबंधित नव्हता. मिरवणूक मार्गावर मागील १४ वर्षांपासून विजेचे खांब अडथळा ठरत आहे. वारंवार मागणी करूनही ते काढले गेले नाहीत, याकडे लक्ष वेधण्यात आले. मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविणे, निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कलश वाढविणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वेगवेगळ्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळतील याकरिता एक खिडकी योजना राबविण्याची मागणी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

मंडळांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण पालिकेच्या माध्यमातून केले जाईल, असे आश्वासन महापौर भानसी यांनी दिले.

मिरवणूक मार्गावरील विविध समस्या सोडण्यासाठी उपाय केले जातील. मंडळांना परवानग्यांसाठी एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. निर्माल्य संकलनासाठी कलशांची संख्या वाढवून स्वच्छता राखली जाईल. गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी गणेशभक्तांनी कृत्रिम तलावात विसर्जन करण्याची गरज आहे. भाविकांच्या सुविधेसाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्यात येणार आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात येईल असे स्पष्ट करून गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याचे आवाहन महापौरांनी केले. अनेक मंडळांनी पर्यावरण स्नेही पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्यास सहमती दर्शविली आहे. सभागृह नेते पाटील यांनी मंडळांच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन त्या सोडविल्या जातील, असे आश्वासन दिले. मंडळाच्यावतीने लक्ष्मण धोत्रे, हेमंत जगताप, महेश बर्वे, सत्यम खंडाळे आदींसह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.