तुम्ही मला नाशिक दत्तक द्या, मी तुम्हाला विकास करून दाखवतो अशी भावनिक साद घालणाऱ्या मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साथ देत नाशिककरांनी भाजपला महापालिकेत बहुमत दिले. आता भाजपचा नाशिकमधील पहिला महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

नाशिकमधील प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी आपण नाशिक दत्तक घेत असल्याचे सांगितले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या एका वाक्याने नाशिकचे राजकारण संपूर्ण ढवळून गेले. मतदारांनीही भाजपला झुकते माप दिले असून यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. नाशिककरांनी भाजपला बहुमताने निवडून दिले आहे. विशेष म्हणजे नाशिकमधील विकासकामाचे दाखले देणा-या राज ठाकरे यांच्या मनसेला नाकारुन नाशिककरांनी भाजपच्या बाजूने मतदान केले.

maharashtra unseasonal rain marathi news
Maharashtra Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा मुक्काम आता १५ एप्रिलपर्यंत, राज्यात आज कुठे आहे इशारा जाणून घ्या
pmc strict action against more than 100 private hospitals
पुणे महापालिकेला अखेर जाग! खासगी रुग्णालयांबाबत उचलली पावले
Nilu Phule childhood memories and relationship with Rashtra Seva Dal
निळू फुलेंचं बालपण, शालेय शिक्षण अन् राष्ट्र सेवा दलाशी कसा आला संबंध? जाणून घ्या…
nagpur girl injured, generator skin peeled off
धक्कादायक! दहा वर्षीय मुलीचे केस जनरेटरमध्ये अडकून त्वचा सोलली…

नाशिकमध्ये शिवसेनेला मोठ्या संख्येने मत मिळून सत्ता सेनेच्या हाती येईल असे अंदाज अनेकांनी बांधले होते. भाजप नेत्याने तिकिटवाटप करताना पैसे घेतल्याचा व्हिडीओ समोर आल्यावर,तसेच गुंडापुंडाना भाजपमध्ये दिलेला प्रवेश आणि पक्षातील वाढती बंडखोरी यामुळे भाजपला या निवडणुकीत फारसा प्रतिसाद मिळणार नाही अशी शक्यताही वर्तवली जात होती. छगन भुजबळ, समीर भुजबळ, देविदास पिंगळे आणि छबु नागरे यांच्या प्रकरणामुळे राष्ट्रवादीकडून कोणतीही अपेक्षा केली जात नव्हती. काँग्रेसही फारशी चर्चेत नव्हती.

गुरुवारी झालेल्या मतमोजणीत नाशिकमध्ये भाजपला ६६ जागा मिळाल्याचे स्पष्ट झाले आणि मनसेसह शिवसेनेला मोठा धक्काच बसला. या विजयाचे शिल्पकार पक्षाचे आमदार आणि शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांना मानले जात आहे. निवडणूक तोंडावर आली असताना पक्षविरोधी परिस्थिती निर्माण झाल्यानंतरही सानप यांनी शांतपणे पक्षावरील संकटाना तोंड दिले. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वर्षभर महापालिका निवडणुकीच्या तयारीत सूक्ष्मनियोजन करत पक्षाला विजयापर्यंत खेचून नेण्यात मोलाचा हातभार लावला.

आता महापालिकेचा महापौर कोण होणार ? हा प्रश्न नाशिककरांना पडला आहे. पक्षाने संपूर्ण बहुमत प्राप्त केल्याने आता महापौरपदासाठी दावेदारी सुरू झाली आहे. महापालिकेसाठी पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे. या गटातून पक्षातील ज्येष्ठ नगरसेविका रंजना भानसी, प्रा. सरिता सोनवणे, माजी नगरसेवक सुरेश खेताडे, माजी नगरसेवक पुंडलिक खोडे, रुपाली निकुळे हे पाच उमेदवार निवडून आले आहेत. महापालिकेच्या नगरसेवक पदावर सलग पाच वेळा निवडून आलेल्या आणि ज्येष्ठता क्रमानुसार पक्षश्रेष्ठींनी विचार केल्यास रंजना भानसी या महापौर पदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. पक्षातील प्रमुख नेते या पदासाठी कोणाला संधी देतात यावर नाशिककरांचे लक्ष लागून आहे.