*  दोन दिवसांच्या विलंबनानंतर मतदार यादी संकेतस्थळावर; 

* १२ हजार नावांतील घोळ दुरुस्तीचा दावा; इच्छुकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया

Ahmednagar, Shirdi, election, sujay vikhe patil,
नगर, शिर्डीमध्ये गेल्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी यंदा एकत्र
telugu desam party
“सत्तेत आल्यास उत्तम दर्जाचं मद्य, कमी किंमतीत उपलब्ध करून देऊ”, निवडणुकीपूर्वी चंद्राबाबू नायडूंचं मतदारांना आश्वासन
dhule fake voter id marathi news, dhule fake voter card marathi news
धुळ्यात बनावट मतदार ओळखपत्र तयार करणारा फोटो स्टुडिओ
Pimpri-Chinchwad city
पिंपरी : सभांसाठी ‘ही’ ६६ ठिकाणे निश्चित

महापालिका निवडणुकीच्या अंतिम मतदार यादीसाठी चाललेली ‘घोळात घोळ’ची कसरत अखेर संपुष्टात येऊन दोन दिवसांच्या विलंबानंतर ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. सुमारे १२ हजार नावांताल चुका दुरुस्त करून ही यादी प्रसिद्ध केल्याचे पालिकेने म्हटले आहे. दोन दिवसांच्या विलंबानंतर ही यादी प्रसिद्ध झाल्यामुळे राजकीय पक्ष आणि इच्छुकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. त्यातच छायाचित्रासह यादी प्राप्त होण्यास आणखी एक दिवस तर छपाई केलेल्या याद्या प्राप्त होण्यास त्याहून अधिक कालावधी जाण्याची धास्ती व्यक्त होत आहे.

महापालिका निवडणुकीसाठी शनिवारी अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची मुदत होती. मुदतीला ४८ तास उलटल्यानंतरही यादी प्रसिद्ध झाली नसल्याने निवडणुकीचा कार्यक्रम विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त झाली. राजकीय पक्षांनी निवडणूक यंत्रणेच्या कार्यशैलीविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा दिला. पालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर हजारोंच्या संख्येने हरकती आल्या. प्रारूप यादीत विविध स्वरूपाच्या मोठय़ा संख्येने चुका होत्या. मतदारांचे आडनाव चुकीचे किंवा नावाच्या जागी आडनाव येणे असे घोळ समोर आले. जवळपास १२ हजार मतदारांच्या नावाबाबतचे घोळ दुरुस्त करताना यंत्रणेची तारांबळ उडाली.

पत्ता स्थलांतरणाबाबत हरकती दाखल झाल्या. मतदार यादीच्या कार्यक्रमानुसार ही यादी २१ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणे बंधनकारक होते. परंतु, त्या दिवशी ही यादी प्रसिद्ध झाली नाही. त्यावेळी महा ऑनलाइन यंत्रणेवर ताण असल्याने ही व्यवस्था संथ असल्याचे कारण दिले गेले. परंतु, मतदार यादीतील घोळ मिटता मिटत नसल्याचे स्पष्ट झाले. यादीतील १२ हजार चुकांची दुरुस्ती झाली नव्हती. मतदार यादी प्रसिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे पालिका यंत्रणेची तारांबळ उडाली. या कामाशी निगडित वरिष्ठ अधिकारी तातडीने मुंबईला रवाना झाले.

सोमवारी सायंकाळपर्यंत प्रसिद्ध न झालेली प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी रात्री उशिरा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याचे उपायुक्त विजय पगार यांनी सांगितले. नावातील १२ हजार स्वरूपाच्या त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या. संकेतस्थळावर छायाचित्ररहित यादी असून पालिकेत छायाचित्रांसह यादी राजकीय पक्ष व उमेदवारांना उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मतदार यादीच्या विलंबाला शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने प्रशासनाला जबाबदार धरले. निवडणूक कार्यक्रमातील दोन-तीन दिवस यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे वाया गेले. छायाचित्रासह मतदार यादीच्या छपाईला आणखी काही दिवस लागतील. त्यात आणखी कालापव्यय होईल, अशी धास्ती इच्छुकांना वाटते. सीडी स्वरूपात मतदार यादी १०० रुपयांना तर छपाई स्वरूपातील यादी १५०० रुपयांना मिळणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.