ताल-लय आणि अभिनयाची सुरेल गुंफण करणारा नटराज पं. गोपीकृष्ण जयंती महोत्सव १८ ते २० ऑगस्ट या कालावधीत परशुराम साईखेडकर नाटय़ मंदिरात होणार आहे. यंदा महोत्सवात आदिती नाडगौडा-पानसे यांच्या संकल्पनेतून ‘दी रिदॅमिक पॉईज’चा आविष्कार उपस्थितांना पाहता येणार आहे.

वंदना, ताल प्रस्तुती, अभिनय पक्ष आणि पदन्यास या सर्व नृत्य आणि नाटय़ यांच्या सादरीकरणात बंदिशींच्या आकृतीबंधानुसार त्यांची गती आणि स्थिती याची गुंफण यात करण्यात आली आहे. ‘दी रिदॅमिक पॉईज’च्या शुभारंभाला कीर्ती कला मंदिराच्या नृत्यांगणा आपली कला सादर करणार आहेत. नृत्य दिग्दर्शन आदिती नाडगौडा यांचे असून संगीत डॉ. अविराज तायडे, पं. जयंत नाईक (वाद्यवृंद संचलन), आशिष रानडे आणि ज्ञानेश्वर सोनार यांचे गायन, बल्लाळ चव्हाण, ओंकार अपस्तंभ (तबला), सुभाष दसककर (संवादिनी), आदित्य कुलकर्णी यांची पढंत व सिंथेसायझरवर ईश्वरी दसककर यांची साथ संगत लाभणार आहे.

readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
shri krushna dwarka
श्रीकृष्णाची द्वारका खरंच पाण्याखाली आहे का? दंतकथा आणि पुरावे काय सांगतात? वाचा सविस्तर…
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…

१९ ऑगस्ट रोजी ठुमरी सादरीकरणात ‘बैठके ठुमरी’ हा प्रकार बनारस घराण्याचे गुरू पं. अशोक कृष्णा आणि जयपूर घराण्याच्या पं. नंदिनी सिंग या द्वितीय पुष्प नृत्यांजलीतून साकारणार आहेत.

महोत्सवाची सांगता २० ऑगस्ट रोजी भरतनाटय़म आणि कथक या दोन भिन्न नृत्यशैलीतून ‘दी रिसोनान्स विथीन’ने होणार आहे. नृत्याच्या सादरीकरणात वापरल्या जाणाऱ्या संज्ञा, संकल्पना, तंत्र आणि मांडणी म्हणजे नेमके काय, नृत्याच्या वस्तुनिष्ठ आणि व्यक्तीनिष्ठ या दोन्ही दृष्टीकोनांचा कसा समन्वय साधला जातो हे नृत्याभ्यासकांना अनुभवता येईल.

गुरू पंडिता शमाताई भाटे आणि गुरू पं. दीपक मुजुमदार या दोन ज्येष्ठ नर्तकांच्या नृत्याविष्काराने महोत्सवाची सांगता होणार आहे. नृत्य महोत्सवास नाशिककरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कीर्ती कला मंदिराने केले आहे.