नाशिकमध्ये पंचवटी परिसरात प्रभाग क्रमांक ३ मध्ये मतदान यंत्रात फेरफार केल्याचा आरोप करत पराभीत उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांना बरोबर घेत गोंधल घातला. यावेळी या जमावाने रास्ता रोको केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या लाठीचार्जमध्ये काही सामान्य नागरिकही जखमी झाले. त्यानंतर पराभूत उमेदवारांच्या या हुल्लडबाज समर्थकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत चार ते पाच पोलीस जखमी झाले. जमावाला आवर घालण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार करत चार राऊंड्स फायर केले.

नाशिकमधील मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये मतमोजणी सुरु असताना हा प्रकार घडला. या सर्व प्रकारामुळे मतमोजणीची प्रक्रिया थांबवण्यात आली.